डिसेंबर 2019 मध्ये रिलायंस जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 40 टक्के दरवाढ केली. तर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मात्र दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला. बीएसएनएल सध्या आपल्या ग्राहकांना जुन्या किंमतीमध्येच काही बेस्ट प्लॅनची ऑफर देत आहे. या प्लॅन्समध्ये दररोज तब्बल 5जीबीपर्यंत डेटा दिला जातो. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत –

दररोज 5जीबी डेटा –
अधिक डेटा वापरणाऱ्यांसाठी बीएसएनएलचा हा प्लॅन बेस्ट पर्याय आहे. या प्लॅनमध्ये दररोज 5जीबी डेटा दिला जात आहे. 548 रुपयांच्या या PRBSTV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर)मध्ये 90 दिवसांची वैधता आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होतो. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळत नाहीत.

डेटा कॅपिंग नसलेला प्लॅन –
कंपनीकडून युजर्ससाठी डेटा कॅपिंग नसलेला प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 1,098 रुपये असून 84 दिवस वैधता आहे. या प्लॅनमध्ये एकूण 375जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात इंटरनेट डेटा मर्यादा नाहीये. बीएसएनएलच्या वेबसाइटवर हा प्लॅन अनलिमिटेड डेटा असलेला प्लॅन असल्याचं म्हटलंय. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात.

3जीबी डेटाचा प्लॅन –
दररोज 3जीबी डेटासाठी बीएसएनएलच्या 78 रुपयांच्या प्लॅनद्वारे रिचार्ज करता येईल. 8 दिवस वैधता असलेल्या या डेटा STV मध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी दररोज 250 मिनिट मिळतात. याशिवाय व्हिडीओ कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये EROS Now एंटरटेनमेंट सर्व्हिसचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.