सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

*     बारावी उत्तीर्ण पुरुष अविवाहित उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी.

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ०९ एप्रिल २०२० रोजी एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्ज आणि इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी कोर्स (INAC) कोर्ससाठी प्रवेश परीक्षा घेणार आहे.

प्रवेश क्षमता – ४१८ पदे.

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी – ३७० जागा

(आर्मी – २०८, नेव्ही – ४२ आणि एअरफोर्स – १२० (यात ग्राऊंड डय़ुटीसाठीच्या २८ पदांचा समावेश आहे)).

नेव्हल अ‍ॅकॅडमी (१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम) – ४८ जागा.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी इ.

पात्रता –

(i) आर्मी विंग एनडीएसाठी – बारावी उत्तीर्ण (कोणतीही शाखा).

(i i) एनडीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि नेव्हल अ‍ॅकॅडमीमधील १०+२ कॅडेट एन्ट्रीसाठी बारावी (फिजिक्स आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण. (बारावीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जुल २००१ ते १ जुल २००४ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी. (एअरफोर्ससाठी १६२.५ सें.मी.),

वजन  उंचीच्या प्रमाणात, दृष्टी – चष्म्याशिवाय – ६/६, ६/९, चष्म्यासह – ६/६, ६/६.

इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरुस्तीकरिता पुढील सराव ठेवावा –

(ए) २.४ कि.मी. अंतर १५ मिनिटांत धावणे, (बी) स्किपिंग,

(सी) पुशअप्स आणि सिटअप्स

(किमान २० प्रत्येकी),

(डी) चिनअप्स किमान ६,

(इ) रोप क्लाइंबिंग – ३-४ मी.

परीक्षा पद्धती – ओएमआर शिटवर उत्तरे काळ्या बॉल पॉइंट पेननेच मार्क करावयाची आहेत.

(ए) लेखी परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची,

(१) मॅथेमॅटिक्स कालावधी २ १/२ तास,

गुण १००.

(२) जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट कालावधी

२ १/२ तास, गुण ६००.

(जनरल अ‍ॅबिलिटी – पार्ट-ए इंग्लिश – २०० गुण. पार्ट-बी – जनरल नॉलेज – ४०० गुण (फिजिक्स -१०० गुण, केमिस्ट्री – ६० गुण, जनरल सायन्स -४० गुण, इतिहास, स्वातंत्र्य चळवळ(समाजशास्त्र) – ८० गुण, जिओग्राफी – ८० गुण आणि करंट अफेअर्स – ४० गुण, यांवर आधारित)) प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.३३ (१/३) गुण वजा केले जातील.

(बी) इन्टेलिजन्स अ‍ॅण्ड पर्सोनॅलिटी टेस्ट (एसएसबी टेस्ट)(जुल ते सप्टेंबर २०२० दरम्यान) –

स्टेज-१ ऑफिसर इन्टेलिजन्स रेटिंग (OIR) – पिक्चर परसेप्शन अ‍ॅण्ड डिस्क्रिप्शन टेस्ट (PP & DT).

स्टेज-२ मुलाखत, समूह चाचणी, अधिकारी चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी आणि कॉन्फरस. या चाचण्या ४ दिवस चालतील. एस.एस.बी./ मुलाखत एकूण – ९०० गुण.

अर्जाचे शुल्क –

रु. १००/- (अजा/अज उमेदवारांना फी माफ).

ट्रेनिंग –

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एनडीए, पुणे येथे दिले जाईल.

इंडियन नेव्हल अ‍ॅकेडमीसाठी इझिमाला,

केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या

(अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/ बी.ए.,

(ब) नेव्हल कॅडेट्सना – बी.टेक . डिग्री.

(क) एअरफोर्स कॅडेट्सना – बी.टेक./ बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/ डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एनडीएमधून उत्तीर्ण आर्मी कॅडेट्सना इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए), डेहराडून येथे (१ वर्षांचे ट्रेनिंग); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षांचे ट्रेनिंग) आणि एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद येथे (१ १/२ वर्षांचे ट्रेनिंग) ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना (१ वर्षांनंतर) फ्लाइंग ऑफिसर पदावर तनात केले जाईल.

आयएमए ट्रेनिंगदरम्यान जेंटलमन कॅडेट्सना

रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी उमेदवारांनी http://www.joinindianarmy.nic.in आणि http://www.careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.inया संकेतस्थळावर दि. २८ जानेवारी २०२० (१८.०० वाजे.)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्ज ४ ते ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत मागे घेता येतील. (अपेंडिक्स- IIB पाहा.)