27 January 2021

News Flash

उद्योजक म्हणून घडण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण गरजेचे

आधुनिक युगात अनेक क्षेत्रातील स्पर्धा वाढत चालली आहे

सध्याच्या आधुनिक युगात अनेक क्षेत्रातील स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचे सगळेच प्रयत्न करतात. भारतातील उद्योगाला चालना देण्यासाठी स्टार्टअप इंडिया मोबेशन यांसारख्या योजना राबविल्या जात आहेत. आजच्या नवीन पिढीमध्ये, तरुणांमध्ये उद्योजक होण्याची किंवा स्वतःचे स्टार्ट-अप सुरू करण्याची इच्छा असते. त्यांच्या या स्वप्नांमुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल, यासाठी अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

छोटा का होईना, पण स्वतःचा उद्योग निर्माण करण्याचे धैर्य या तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षणसंस्थांमध्ये उद्योजकांसाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते आहे. याचा फायदा त्यांना रोजगार निर्मितीसाठी तसेच उद्योगात आलेल्या किंवा येणाऱ्या अनेक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी होतो. उद्योजकांना दिले जाणारे प्रशिक्षण हे त्यांच्यातील उद्योजकाला वाव देणारे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणारे असे असते. “आयटीम” या बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणसंस्थेत उद्योगाला उपयुक्त असलेले प्रशिक्षण दिले जाते. या शिक्षणात प्रामुख्याने तीन गोष्टींवर जास्त भर दिला जातो.

१. प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना उद्योग जगाची विस्तृत माहिती दिली जाते. उद्योजकतेत सर्वांशी संपर्क येतो, त्यामुळे त्यांना विस्तृत उद्योग जगताची माहिती असणे गरजेचे आहे. याचा त्यांना भविष्यात उपयोग होऊ शकतो.

२. विद्यार्थ्यांची मानसिकता व्यावसायिक दृष्टीकोनातून तयार करणे. उद्योगजगतेसंदर्भात विविध कार्यक्रम आयोजित करणे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगजगताविषयी सकारात्मक विचारसरणी निर्माण केली जाते.

३. एखाद्या उद्योगाला प्रभावीपणे सुरुवात करणे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर उद्योगाला उभारणी करण्यासाठी प्रोत्साहन करणे, इक्यूबेशन सेंटरमधून त्यांना उद्योगासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना या उद्योगासाठी प्रभावीपणे प्रोत्साहन करणे.
विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणामुळे त्यांच्यात तयार होणाऱ्या नव्या उद्योजकाला उद्योगजगतात वावरण्याचे चांगले ज्ञान मिळते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील आत्मविश्वासदेखील द्विगुणित होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 1:09 am

Web Title: everyone should have proffesional qualification to start a bussiness
Next Stories
1 सिगारेटच्या पाकिटावर आता टोल फ्री क्रमांक आणि प्रबोधनात्मक चित्र
2 कॅलरीज घटविण्यासाठी ‘या’ गोष्टी आवर्जून करा
3 JIO धमाका ! मुंबईत FREE मध्ये मिळणार स्वप्नातलं घर, जिओची दमदार ऑफर
Just Now!
X