News Flash

व्यसनमुक्तीसाठी व्यायाम आवश्यक!

अ‍ॅरोबिक व्यायामामुळे अमली पदार्थ आणि मद्याचे व्यसन असणाऱ्यांच्या उपचारात मदत करू शकतो,

| June 1, 2018 02:19 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वॉशिंग्टन : अ‍ॅरोबिक व्यायामामुळे अमली पदार्थ आणि मद्याचे व्यसन असणाऱ्यांच्या उपचारात मदत करू शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

कार्डिओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅरोबिक  व्यायाम प्रकारामुळे हृदयाचे स्पंदन आणि श्वासोच्छ्वास वाढतो, त्याचप्रकारे रक्तामध्ये अधिकाधिक ऑक्सिजनचा प्रसार होतो. यामुळे मधुमेह, संधिवात, हृदयरोगांसारख्या आरोग्याच्या इतर समस्यादेखील कमी होत असल्याचे आढळते. यामुळे मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य कमी करण्यातदेखील मदत होते. अमेरिकेतील बफेलो विद्यापीठातील संशोधकांनी अ‍ॅरोबिक व्यायामामुळे मेंदूवर होणारा परिणाम आणि त्याचा व्यसनमुक्तीवर पडणारा प्रभाव याचा अभ्यास केला. अ‍ॅरोबिक व्यायामामुळे या व्यतिरिक्तदेखील फायदे होत असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. हा व्यायाम मद्य, निकोटिन, ओपीआइड्स यासारख्या वेगवेगळय़ा व्यसनाच्या विविध टप्प्यांवर मदत करू शकतो, असे बफेलो विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक पॅन्योटिस थॅनोस यांनी सांगितले.

रोज अ‍ॅरोबिक व्यायाम केल्यामुळे मेसोलिम्बिक डोपामाइन प्रक्रियेत बदल होतो. डोपामाइन हे चेंतातंतूमध्ये तयार होणारे रसायन व्यसनाशी संबंधित असून काही तरी मिळविल्याची भावना, प्रेरणा आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. व्यायामामुळे अमली पदार्थामुळे बदल झालेली डोपामाइन संकेत प्रकिया सामान्य होऊ शकते त्याचप्रमाणे याचा उपचारपद्धतीत कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो यावर अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे व्यसनांवर जे अभ्यासकेंद्रित आहेत त्यांनी संशोधकांना व्यसनातून सुटलेल्या लोकांनी पुन्हा व्यसनाकडे न वळण्यासाठी नवी उपचारपद्धती विकसित करायला हवी, असे थॅनोस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:19 am

Web Title: exercise help to treat addiction
Next Stories
1 लोकांना जाणवतीये मनमोहन यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमकरता – अरविंद केजरीवाल
2 पाकिस्तान सरकार करणार मुशर्रफ यांचा पासपोर्ट ब्लॉक
3 आडनावात ‘सिंह’ जोडलं म्हणून मिशा कापल्या, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X