News Flash

भारतात फेसबुक काही काळ बंद

नेटकऱ्यांमध्ये एकच गोंधळ

संग्रहित छायाचित्र

अनेकांच्या गळ्यातील ताईत असणारी फेसबुक ही सोशल मीडिया साईट मंगळवारी संध्याकाळी अचानक बंद पडली. जवळपास अर्धा तासासाठी फेसबुक बंद पडल्याने नेमके काय झाले कोणालाच कळत नव्हते. सुरुवातीला फेसबुक अचानक बंद पडल्याने काहींना आपल्या इंटरनेटला काही अडचण आली आहे असे वाटले तर काहींना आपल्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला काहीतरी समस्या झाली आहे असे वाटले. पण व्हॉटसअॅप किंवा ट्विटर यांसारख्या इतर माध्यमांतून एकमेकांशी संपर्क केल्यावर ही फेसबुकचीच समस्या असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे ही समस्या फेसबुकबरोबरच इन्स्टाग्रामलाही आल्याचे काही वेळाने समजले.

ट्विटरवर फसबुक बंद असल्याने एकच गोंधळ उडाला आणि नेटकऱ्यांनी ही सोशल मीडिया साईट बंद झाल्याचे दुख: व्यक्त करण्यास सुरुवात केली. सॉरी समथिंग वेंट राँग, अनेबल टू कनेक्ट, नेटवर्क एरर असे मेसेज येत होते. असे असले तरीही एद्याप फेसबुकच्या अधिकृत हँडलवरुन याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. याआधी फेसबुक अशाप्रकारे बंद झाल्याची घटना भारतात तरी घडलेली नव्हती. त्यामुळे ही पहिलीच वेळ आहे असे दिसते.

याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास ४० मिनिट व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती. त्यावेळी जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे नंतर लक्षात आले होते. काही वेळानंतर #whatsappdown असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याचा उलगडा झाला. सध्या एकमेकांशी कनेक्ट राहण्याचे मोठे साधन असलेले हे अॅप बंद पडल्याने जगभरात एकच गोंधळ उडाला होता. सेवा कायमची हॅक तर झाली नाही ना अशी भीतीही काही वेळाने व्यक्त होऊ लागली होती. पण जवळपास ४० मिनिटांनंतर व्हॉट्सअॅप पूर्ववत झालं. याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:28 pm

Web Title: facebook and instagram down for users in india
Next Stories
1 वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ एकत्र खा
2 प्रजासत्ताक दिनानिमित्तानं जिओनं आणली भन्नाट ऑफर!
3 हसत खेळत कसरत : ‘शोल्डर श्रग्ज’
Just Now!
X