News Flash

आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही येणार Instagram! फेसबुकची घोषणा!

१३ वर्षांखालील मुलांसाठी देखील इन्स्टाग्रामचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेसबुकने जाहीर केला आहे.

संग्रहित छायाचित्र

आजची पिढी ही टेक्नोसॅव्ही असल्याचं म्हटलं जातं. इंटरनेट आणि गॅजेट्सच्या दुनियेत ही पिढी अगदी मुक्त संचार करत आहे. पण आता पुढच्या पिढीला देखील अगदी लहान वयातच या गॅजेट्स आणि ऑनलाईन विश्वाची भुरळ पडली आहे. अनेक लहान मुलं आपल्या पालकांकडे ऑनलाईन जगात येण्यासाठी, सोशल मीडियावर अकाऊंट्स उघडण्यासाठी हट्ट करू लागली आहेत. काही पालकांनी हे हट्ट पुरवले देखील, पण काहींसाठी ही डोकेदुखी ठरली आहे. पण आता यावर Facebook ने पर्याय शोधला असून आता १३ वर्षांच्या खालच्या मुलांसाठी देखील Instagram चं अ‍ॅप कंपनीकडून तयार केलं जात आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीचे प्रवक्ते जो ऑसबोर्न यांनी ही माहिती दिली आहे.

पालकांना ठेवता येणार नियंत्रण!

“आपल्या मित्रमंडळींसोबत ‘अप टू डेट’ राहण्यासाठी अनेक मुलं त्यांच्या पालकांना सोशल मीडिया अ‍ॅपवर अकाऊंट उघडण्याची परवानगी मागत आहेत. सध्या पालकांकडे अशा सोशल मीडिया अ‍ॅपचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही आता फेसबुक मॅसेंजर किड्सप्रमाणेच इन्स्टाग्रामचं अजून एक अ‍ॅप तयार करत आहोत. हे अ‍ॅप मुलांसाठी योग्य असेल आणि पालकांना त्याचं नियंत्रण करता येऊ शकेल”, असं ऑसबोर्न म्हणाले आहेत. त्यामुळे लवकर १३ वर्षांखालच्या मुलांसाठी देखील इन्स्टाग्रामचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या नियमांनुसार इन्स्टाग्राम अ‍ॅप वापरण्यासाठी १३ वर्षांची अट घालण्यात आली आहे. सध्या लहान मुलांसाठी फेसबुक मेसेंजर किड्स हे अ‍ॅप आहे. मात्र, त्यामध्ये देखील पालकांनी नकार देऊनही काही व्यक्तींशी मुलं चॅट करू शकत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून बराच वाद देखील ओढवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 5:06 pm

Web Title: facebook announces instagram app for under 13 kids with parental control pmw 88
टॅग : Online
Next Stories
1 Jio चं पुढचं पाऊल! आता जगभरातील Android टीव्हींसाठी जिओ ब्राऊजर उपलब्ध!
2 OnePlus 6 भारतात लॉन्च : आजपासून विक्रीला सुरुवात, 256 GB स्टोरेजसह मिळणार 8 GB रॅम
3 रिलायन्स जिओची बुस्टर ऑफर; जादा डेटा, एसएमएस पॅक मिळणार
Just Now!
X