News Flash

ओएलएक्सप्रमाणे आता फेसबुकवरही करता येणार वस्तूंची खरेदी-विक्री

यूजर्ससाठी आनंदाची बाब

संग्रहित छायाचित्र

आपल्या घरातील आपल्याला नको असलेल्या किंवा जुन्या झालेल्या वस्तू विकण्यासाठी काही वर्षांपूर्वी ओएलएक्स आले. यावर अनेकजण आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू अगदी परवडतील अशा किंमतीत खरेदीही करतात. जगभरातील ग्राहकांमध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असणारी ही वेबसाईट अतिशय कमी कालावधीत प्रसिद्धही झाली. अशाचप्रकारचे एक फिचर फेसबुकने बाजारात आणले आहे. या फिचरची सध्या चाचणी सुरु असून वस्तू खरेदी आणि विक्री करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण भारतातील यूजर्स त्याचा फायदा घेऊ शकणार आहेत.

सध्या अमेरिकेसह जगातील २५ देशांमध्ये हे फीचर वापरात आहे. आणि त्याचे रिपोर्टसही चांगले आहेत, त्यामुळे भारतीयांना या फिचरची प्रतिक्षा आहे. त्यामुळे Olx आणि Quickr या वेबसाईटला आता स्पर्धा निर्माण होणार आहे. मात्र भारतातील नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असे म्हणता येईल. याचे वेगळे अॅप्लिकेशन असेल त्यात शॉप असे आयकॉन दिसेल. त्यामध्ये ग्राहकांना आपल्याला जी वस्तू विकायची आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे.

Olx आणि Quickr प्रमाणेच ग्राहक फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधतील आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूचा पुढचा तपशील घेतील. मात्र यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक व्यवहारात कंपनीचा कोणत्याही स्वरुपाचा सहभाग नसेल. याबाबत कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. फेसबुकवर ग्राहकांना विक्रेत्याची प्रोफाईलही पाहता येणार आहे. फेसबुकचे मोठ्या प्रमाणात यूजर्स असल्याने हे फिचर लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाजही व्यक्त कऱण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 11:00 am

Web Title: facebook brings new feature for purchase and sale of goods like facebook brings new feature for purchase and sale of goods like olx and quickr olx and quickr
Next Stories
1 शूजमधून येणारी दुर्गंधी कशी घालवाल?
2 रक्तदाबाचा विकार आता १३०-८० पासूनच लागू
3 मायक्रोसॉफ्ट, गुगल, फ्लिपकार्ट कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा देतात माहितीये?
Just Now!
X