News Flash

अडचणीत वाढ! फेसबुकला विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि WhatsApp ?

अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटले, खटला दाखल

दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि ‘युएस फेडरल ट्रेड कमिशन’ने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना ‘चिरडण्यासाठी’ बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस पॅरेंट कंपनीपासून वेगळा ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.

बुधवारी फेसबुकविरोधात हा खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर येताच फेसबुकचे शेअर्सही गडगडले. एखाद्या मोठ्या टेक कंपनीविरोधात अमेरिकेमध्ये यावर्षात दाखल झालेला हा दुसरा मोठा खटला ठरला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकांआधी गुगलविरोधातही खटला दाखल करण्यात आला होता. ऑनलाइन सर्च आणि जाहिरातींच्या मार्केटवर ताबा मिळवण्याचा आरोप गुगलवर करण्यात आला होता.

फेसबुकविरोधात दाखल केलेल्या खटल्याबाबत फेडरल ट्रेड कमिशन आणि न्यू-यॉर्क अ‍ॅटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी माहिती दिली. जवळपास एका दशकापासून, फेसबुक आपल्या ताकदीचा वापर करुन छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकण्यासाठी करत आहे, असं जेम्स म्हणाले. आपल्या वर्चस्वासाठी धोका ठरण्याआधीच फेसबुक छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचं अधिग्रहण करते असाही आरोप त्यांनी केला.

फेसबुकने आपला एकाधिकार टिकवण्यासाठी एक रणनीति तयार केली आहे. 2012 मध्ये फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामचं अधिग्रहण, 2014 मध्ये मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचं अधिग्रहण हा त्यांच्या रणनितीचाच भाग आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तोटा झाला आणि सोशल नेटवर्किंगसाठी नेटकऱ्यांसमोर मर्यादित पर्याय राहिलेत असा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, फेसबुकच्या जनरल काउंन्सल जेनिफर न्यूस्टेड यांनी खटल्याचा विरोध करताना हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे आरोपही त्यांनी फेटाळले. अधिग्रहण केल्यापासून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपला तोटा होण्याऐवजी जास्त फायदा झाला, शिवाय दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सनाही फायदा झाल्याचं, जेनिफर न्यूस्टेड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल जर फेसबुकविरोधात गेला तर फेसबुकला इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स विकावे लागण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 12:33 pm

Web Title: facebook faces us lawsuits that could force sale of instagram whatsapp know details sas 89
Next Stories
1 Apple अ‍ॅप स्टोअर मध्ये आणणार प्रायव्हसी लेबल; WhatsApp म्हणालं…
2 व्होडाफोन आयडियाच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, कॉलिंग; जाणून घ्या माहिती
3 ‘ई’ वाहनांची संथगती 
Just Now!
X