X

लवकरच फेस स्कॅनिंगद्वारे लॉगइन करता येणार फेसबुक!

फेसबुकचा पासवर्ड लक्षात राहत नाही

अनेकदा आपल्याला फेसबुकचा पासवर्ड लक्षात राहत नाही. पासवर्ड लक्षात न राहिल्याने वारंवार नव्या पासवर्डची मागणी करून आपल्याला फेसबुक अनलॉक करावं लागतं. आपल्या जवळच्या व्यक्तीला पासवर्ड माहिती असेल तर आपल्या नकळत फेसबुक अकाऊंट वापरले जाण्याची शक्यता असते. थोडक्यात काय तर सध्याच्या पासवर्ड प्रणालीमुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. पण लवकरच तुमच्या या अडचणीवर तोडगा निघणार आहे.

वाचा : मृत्यूनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटचे काय होते माहितीये?

कारण फेसबुक सध्या फेस रिकग्नेशन या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे. त्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुक अनकलॉक करता येणार आहे. ‘टेकक्रंच’ने फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे.  फेसबुकसाठी फेशियल रेकग्निशन हे तंत्र काही नवं नाही. तुमच्या सोबत फोटोमध्ये इतर मित्र मैत्रीणी असतील तर त्यांची नाव काय आहेत हे फेसबुक अगदी अचूक ओळखतो. तेव्हा एखाद्या मित्राला टॅग करताना तुम्हाला त्याच्या नावाची शोधाशोध करावी लागत नाही. आता याच फीचरचा वापर लॉग इन करण्यासाठी होऊ शकतो का, याची चाचणी सुरू आहे. हे फीचर कधी येईल याची तुर्तास तरी माहिती उपलब्ध नाही. अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल x हा फोन लाँच केला होता. यात फेशियल रेकग्निशनचे फीचर देण्यात आलं आहे. अशाच प्रकारचं फीचर फेसबुकमध्येही उपलब्ध होणार याची चर्चा असल्याने अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे.

वाचा : रक्तदात्यांनो, फेसबुकच्या नव्या फिचरबद्दल आवर्जून जाणून घ्या!

First Published on: October 6, 2017 2:03 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain