26 September 2020

News Flash

फेसबुकवर आता बनवा स्वतःचा ‘अ‍ॅनिमेटेड अवतार’, आलं मजेशीर फीचर

फेसबुकने युजर्ससाठी आणलं मजेशीर फीचर...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स स्वतःचं व्हर्च्युअल कार्टून किंवा अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर बनवू शकतात. ‘Avatars’ नावाचं नवीन फीचर फेसबुक अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आलं आहे.

नवीन फीचर अनेक चेहरे, हेअर स्टाइल आणि आउटफिट्सला सपोर्ट करतं. भारतीय युजर्सच्या दृष्टीकोनातून हे फीचर कस्टमाइज करण्यात आलं आहे, असं फेसबुककडून सांगण्यात आलं. एकदा अवतार बनवल्यानंतर युजर याच्या मदतीने आपल्या चेहऱ्याचे स्टिकर्स मेसेंजरवर पाठवू शकतात, कमेंट्समध्येही याचा वापर करता येईल. गेल्या वर्षापासून कंपनी या फीचरची टेस्टिंग घेत होती.

सर्वप्रथम फोनमध्ये फेसबुक आणि मेसेंजर अ‍ॅप लेटेस्ट व्हर्जनसह अपडेट करा. या अ‍ॅप्सच्या Lite व्हर्जनवर हे फीचर काम करणार नाही हे लक्षात ठेवा. व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी अवतार क्रिएट करण्याचा पर्याय मिळेल. कमेंट सेक्शनमध्ये Smily आयकॉनवर टॅप केल्यानंतर Make your Avatar असा पर्याय दिसेल. याशिवाय फेसबुक अ‍ॅप ओपन केल्यानंतर कोपऱ्यात असलेल्या तीन लाइनच्या ‘हॅमबर्गर आयकॉन’वर टॅप करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 11:43 am

Web Title: facebook launches avatars now in india get details sas 89
Next Stories
1 Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, ‘सेल’मध्ये आहेत शानदार ऑफर्स
2 करोना ट्रॅकर ‘आरोग्य सेतू’मध्ये तांत्रिक बिघाड, दोन तासांनी सेवा झाली पूर्ववत
3 रताळ्याचं रुचकर सलाड
Just Now!
X