लोकसभा निवडणूक २०१९ अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावेळी लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. ११ एप्रिल रोजी मतदानाची सुरूवात होणार असून १९ मे रोजी शेवटचा टप्पा पार पडणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या वेळी ९० कोटी मतदार मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने निवडणुकी संबंधात दोन नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत.

फेसबुकच्या या फीचर्सद्वारे जगभरातील युझर्सनां उमेदवारांनी तयार केलेले व्हिडिओ पहायला मिळणार आहेत. हे व्हिडिओ यूझर्सच्या न्यूज फिडमध्ये दिसणार असून लोकसभा निवडणुकीच्या दिवसापर्यंतच उपलब्ध असणार आहेत. Candidate Connect आणि Share You Vote अशी या दोन फीचरची नावे आहेत.

Candidate Connect या फिचरद्वारे युझर्सनां त्यांच्या भागातील उमेदवाराची माहिती व्हिडिओद्वारे मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये उमेदवार स्वत:ची ओळख आणि निवडणूकीत त्यांना का निवडून द्यावे याची माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ २० सेकंदांचा असणार आहे. या फीचरद्वारे युझर्सनां त्यांच्या भागातील उमेदवारांबद्दल अधिक माहिती जाणून घेता येणार आहे. तसेच Share You Vote हे फेसबुकचे दुसरे फीचर आहे. या फिचरद्वारे युझर्सनां मतदानाच्या दिवसांची माहिती मिळणार आहे. हे दोन्ही फीचर १२ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

या फीचरचा वापर कसा कराल?

फेसबुक पेज ओपन केल्यानंतर फेसबुक सेटिंगमधील बुकमार्क ऑप्शनव्दारे किंवा न्यूजफीडमधून एका मेसेजद्वारे या टूलचा अ‍ॅक्सेस घेतला जाऊ शकतो.

११ एप्रिल ते १९ मे पर्यंत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतील ३०,००० उमेदवारांच्या सुरशिक्षतेसाठी फेसबुकची टिम कार्यरत आहे. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क संविधानाने दिला आहे. त्यामुळे मतदान करणे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.