भारतीय युजर्ससाठी फेसबुकनं तीन नवे फीचर्स आणले आहेत. फेसबुकनं खूप आधीच स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामसह, व्हॉट्समध्येही ‘स्टोरी’ फीचर आणलं होतं. आता फेसबुकनं आपल्या स्टोरी फीचरमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. यानुसार युजर्सना ‘स्टोरी’मध्ये अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करून नंतर पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे युजर्सना या स्टोरीमध्ये व्हॉईस पोस्टही अपलोड करता येणार आहे तर ‘re-live those memories’ हे देखील महत्त्वाचं फीचर यात अपडेट करण्यात आलं आहे. चला तर मग या तिन्ही फीचर्सबद्दल विस्तृत जाणून घेऊयात.

१ : स्टोरी फिचरमधल्या पहिल्या अपडेटनुसार युजर्सना त्यांच्या मित्र- मैत्रिणींनी अपलोड केलेल्या स्टोरी सेव्ह करून नंतर पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे जे व्हिडिओ आणि फोटो फेसबुक कॅमेरा वापरून स्टोरी फीचर्समध्ये अपलोड करण्यात आले आहेत ते फोटो, व्हिडिओ त्यांना सेव्ह करता येणार आहे. अनेकदा हे फोटो मोबाइलमध्ये सेव्ह होतात त्यामुळे मोबाइलची मेमरी भरते. या फिचरमुळे ते फोटो मोबाइलमध्ये सेव्ह न होता फेसबुकवर सेव्ह होणार आहेत. अर्थात फक्त आणि फक्त युजर्सलाच ते पाहता येणार आहे. या फीचरमुळे युजर्सच्या मोबाइलमधील स्पेस वाचणार आहे.

2 : व्हॉइस पोस्ट : व्हॉइस पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहता, स्टोरी फीचर्ससाठी व्हॉइस पोस्ट हे फीचरदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओज्, फोटोबरोबर युजर्सना २० सेकंदापर्यंतची व्हॉइस पोस्टही अपलोड करता येणार आहे.

३ : re-live those memories : फेसबुकवर अपलोड केलेल्या ‘स्टोरी’ या २४ तासांपर्यंतच लाइव्ह होतात. त्यानंतर त्या निघून जातात. re-live those memories या फीचरमुळे युजर्सना त्यांच्या लाइव्ह स्टोरी सेव्ह करता येणार आहेत, त्या स्टोरी नंतर केव्हाही त्यांना पुन्हा फेसबुकवर शेअर करता येणार आहे.