व्हॉट्स अॅपप्रमाणे आता फेसबुकवरही एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुक मेसेंजरचे युजर्स आता लवकरच एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करु शकणार आहेत. हे नवं फिचर लवकरच मेसेंजरवर येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. सर्वप्रथम हे फिचर iOS चं व्हर्जन 191.0 मध्ये येणार आहे. मेसेज डिलीट करण्यासाठी युजरकडे 10 मिनिटांचा वेळ असेल, म्हणजे मेसेज पाठवल्याच्या 10 मिनिटांमध्येच हा मेसेज डिलीट करता येणार आहे.


अनेक दिवसांपासून युजर्सकडून अशा फिचरची मागणी केली जात होती. या नव्या फिचरबाबत एप्रिल महिन्यापासून कंपनीचा विचार सुरू होता आणि ऑक्टोबरमध्ये या फिचरची चाचणी सुरू झाली होती. नव्या अपडेटमध्ये iOS युजर्स कोणताही मेसेज 10 मिनिटांच्या आतमध्ये डिलीट करु शकतील. जर एखाद्या युजरने चुकून एखादा मेसेज किंवा फोटो पाठवला तर डिलीट करण्यासाठी त्याला 10 मिनिटांचा वेळ असेल.