08 July 2020

News Flash

युजर्ससाठी ‘कलरफुल’ धमाका! फेसबूक आणणार नवं फीचर

युजर्ससाठी नवं सरप्राइज! युजर्ससाठी नवं सरप्राइज!

संग्रहित छायाचित्र.

गेल्या काही दिवसांत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की फेसबुक युजरफ्रेंडली होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स आणून बदल करण्याच्या प्रयत्नात फेसबुक आहे. फेसुबकचे हे फीचर्स युजर्सच्याही पसंतीस उतरत आहे. आता फेसबुक आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच युजर्सना काहीतरी हटके अनुभवता येणार आहे.

फेसबुक आपल्या कॉमेंट बॉक्सवर अधिक काम करत आहे. तेव्हा काही दिवसांत युजर्सना कॉमेंटच्या मागे रंगीबेरंगी बॅकग्राऊंड ठेवता येणार आहे. स्टेटस अपडेट करताना जसा रंगीबेरंगी बॅकग्राऊंड, थीम वॉलपेपर ठेवण्याचा पर्याय युजर्सला देण्यात आलाय, तसाच तो कॉमेंट करताना देखील देण्यात येणार आहे. ‘द नेक्स्ट वेब’ने फेसबुकच्या या फीचरची माहिती दिलीये.  कलरफुल कॉमेंट बॉक्सनंतर फेसबुक आणखी एका फीचर आणण्याच्या तयारीत असल्याचं ‘द नेक्स्ट वेब’नं म्हटलं आहे. त्यानुसार युजर्सना आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीज् फेसबुकवर लिंक करता येणार आहेत. फेसबुकवर फोटो स्टोरीचा पर्याय फार पूर्वीपासूनच उपलब्ध आहे, पण आता त्यात हे नवं फीचरदेखील देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2017 1:40 pm

Web Title: facebook new feature for comments box
टॅग Facebook
Next Stories
1 अॅसिडिटीचा त्रास होतोय? कसा कमी कराल?
2 बॉडी स्प्रेचा असा वापर ठरेल उपयुक्त
3 मनःशांती हवीये? हे आसन करुन पाहा
Just Now!
X