01 March 2021

News Flash

फेसबुकने Delete केले 5.4 अब्ज अकाउंट, कारण…

सोशल मीडियातील सर्वाधिक प्रभावी माध्यमांपैकी एक फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 5.4 अब्ज अकाउंट डिलीट केले आहेत.

सोशल मीडियातील सर्वाधिक प्रभावी माध्यमांपैकी एक फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 5.4 अब्ज अकाउंट डिलीट केले आहेत. डिलीट केलेले हे अकाउंट फेक अकाउंट होते असं फेसबुककडून सांगण्यात आलंय. तब्बल 5.4 अब्ज फेक अकाउंट फेसबुकने डिलीट केले आहेत. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यादरम्यान कंपनीने हे अकाउंट डिलीट केलेत. याशिवाय बाल शोषण आणि आत्महत्येसंदर्भात जवळपास एक कोटी फेसबुक पोस्ट देखील हटवल्या आहेत. वेबसाइटच्या लेटेस्ट कंटेंट मॉडरेशन रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या वर्षीही याच कालावधीत फेसबुकने फेक अकाउंट हटवले होते. त्या तुलनेने यावर्षी हटवण्यात आलेल्या फेक अकाउंटच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. याशिवाय बाल शोषण संबंधित जवळपास 1.16 कोटी पोस्ट फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवले आहेत. याशिवाय फेसबुक टीमने 7.5 लाख पोस्ट इन्स्टाग्रामवरुनही हटवल्या आहेत. फेसबुकने रिपोर्टमध्ये आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट हटवण्यात आल्याचंही म्हटलंय. हटवण्यात आलेल्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पोस्टबाबात पहिल्यांदाच आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या २५ लाख पोस्ट्स हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच ड्रग सेल्सशी संबंधित 44 लाख पोस्टही हटवल्या आहेत.

आणखी वाचा- ‘फेसबुक पे’ : व्हॉटस अ‍ॅप, मेसेंजर व इन्स्टाग्रामच्या युजर्ससाठी नवी सेवा

फेसबुक कारवाई का करतेय?
फेसबुकचा वापर करणाऱ्यांमध्ये जशी वाढ होतेय तसा याचा गैरवापर करणाऱ्यांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. याला आळा घालण्याचा प्रयत्न फेसबुककडून सुरू आहे. त्यानुसारच हे अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत. जर फेसबुकवर कोणी फेक अकाउंटचा वापर करत असेल तर आधीच्या तुलनेने ते अकाउंट आता त्वरीत ट्रॅक करता येतात, आणि लगेच डिलीट केले जातात असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. कंटेंटच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे.

सरकारला हवाय युजर्सचा डेटा. पण का?
तसंच पारदर्शकतेच्या(ट्रांसपरन्सी) अहवालानुसार 2019 च्या पहिल्या तिमाहीत युजर्सच्या डेटासाठी सरकारकडून विनंती करण्यामध्ये 16 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे, त्यानंतर भारत, युके, जर्मनी आणि फ्रांसचा समावेश आहे.

5.4 अब्ज अकाउंट का डिलीट केले ?
1. हे अकाउंट फेक अकाउंट होते
2. केले होते फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन
3. पोस्ट होत्या आक्षेपार्ह

फेसबुकने कोणत्या पोस्ट केल्या डिलीट?
-1.16 कोटी पोस्ट बाल शोषण संबंधित
-25 लाख पोस्ट्स आत्महत्येसंदर्भात
-44 लाख पोस्ट ड्रग सेल्सशी संबंधित

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 11:26 am

Web Title: facebook removes 5 4 billion fake accounts sas 89
Next Stories
1 आधार कार्डबाबत करु नका ‘ही’ चूक, अन्यथा 10 हजार रुपये दंड
2 ‘बुलेट 350’ च्या किंमतीत वाढ, Royal Enfield ने केली घोषणा
3 नेत्यांच्या रांगेतील ‘या’ व्यक्तीबद्दल समजल्यावर वाढेल पवारांबद्दलचा आदर
Just Now!
X