प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ या आपल्या दोन्ही कंपन्यांचे फेसबुक पेज बंद करुन सोशल मीडियाच्या विश्वात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर फेसबुकच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मग मार्क झुकेरबर्गने फेसबुकच्या खातेदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही. माहितीची गोपनीयता कायम राखण्यासाठी पावले उचलली जातील, मी तांत्रिक चूक केलीच, पण व्यावसायिकही चूक केली, असे म्हटले होते. फेसबुकवरुन तुमचे कॉल आणि मेसेज कसे रेकॉर्ड केले जातात याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी…

१. अँड्रॉईडवर तुम्ही फेसबुक मेसेंजर किंवा फेसबुक लाईट वापरत असाल आणि तुम्ही परवानगी दिली असेल तर तुमच्या कॉल आणि मेसेजची हिस्टरी रेकॉर्ड होते. मात्र सेटींगमध्ये जाऊन हे रेकॉर्डींग ठेवणे तुम्हाला बंद करता येऊ शकते.

२. https://www.facebook.com/help/838237596230667 यावर जा. त्यानंतर https://www.facebook.com/mobile/messenger/contacts या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची कॉन्टॅक्ट हिस्टरी डिलीट करु शकता. फेसबुक लाईट वापरणाऱ्यांसाठी https://www.facebook.com/help/fblite/355489824655936 ही साईट उपयुक्त ठरु शकते.

३. मेसेंजरमध्ये लॉगइन करताना तुम्हाला लर्न मोअर किंवा नॉट नाऊ तसेच टर्न ऑन असे पर्याय विचारले जातात. तर फेसबुक लाईट वापरणाऱ्यांसाठी टर्न ऑन किंवा स्कीप असे पर्याय असतात. या पर्यायांचा योग्य तो वापर करणे आवश्यक असते. हे तुम्ही ऑन ठेवले तर तुमची माहिती रेकॉर्ड केली जाऊ शकते.

४. तुमचा किती डेटा फेसबुककडून रेकॉर्ड झाला आहे हे पाहण्यासाठी केवळ एक झिप फाईल डाऊनलोड करावी लागते. यामध्ये कोणते जाहिरातदार तुमची माहिती वापरत आहेत ते दिसते.

तपासणी करायच्या पायऱ्या

१. https://register.facebook.com/download/ यावर क्लिक करा

२. तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंट सेटींग्जमध्ये जाल. यामध्ये डाऊनलोड कॉपी असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

३. ‘डाऊनलोड युवर इन्फॉरमेशन’ यावर क्लिक केल्यावर ‘डाऊनलोड अर्काईव्हवर’ क्लिक करा.

४. मग तुमचा पासवर्ड विचारला जाईल. तो दिल्यावर डेटा तयार झाल्यावर डाऊनलोडींगसाठी तुम्हाला कळवण्यात येईल, अशा स्वरुपाचा मेसेज येईल.

५. मग या मेसेजवर क्लिक करुन तुम्ही डेस्कटॉपवर झिप फाईल डाऊनलोड करु शकता.

६. त्यानंतर इतर फाईल्स काढून टाका आणि कॉन्टॅक्ट इन्फो असलेल्या HTML फाईलवर क्लिक करा.

७. यावर तुम्हाला तुमचा फेसबुकने कॉल आणि मेसेजचा मागील अनेक वर्षांपासून जमा केलेला डेटा मिळी शकेल.