22 April 2019

News Flash

तीन का दम… फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअॅप होणार लिंक

यामुळे एका अॅप्लिकेशनवर केलेला मेसेज दुसऱ्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अॅक्सेस करता येणार आहे. यामुळे मेसेज सुरक्षित राहण्यासही मदत होणार आहे.

सर्वच वयोगटांमध्ये सोशल मीडियाचा वापर सध्या वाढला आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. कधी कामासाठी तर कधी दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी ही माध्यमे सर्रास वापरली जातात. यामध्ये सध्या व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर यांचा प्रामुख्याने वापर होताना दिसतो. हे तिन्हीही अॅप्लिकेशन्स म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. आतापर्यंत ही तिन्हीही अॅप्लिकेशन्स आपल्यातील अनेक जणांनी वापरली असतील पण आता ती सगळी एकत्र वापरता येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी लिंक करण्यात आले होते. आता व्हॉट्सअॅपही यामध्ये समाविष्ट झाले असून हे तिन्ही प्लॅटफॉर्म युजर्सना एकत्रित वापरता येणार आहेत. एंड टू एंड इन्स्क्रीप्शनच्या माध्यमातून ही तिन्ही अॅप्लिकेशन्स एकत्र वापरता येणार आहेत. यामुळे एका अॅप्लिकेशनवर केलेला मेसेज दुसऱ्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अॅक्सेस करता येणार आहे. यामुळे मेसेज सुरक्षित राहण्यासही मदत होणार आहे.

फेसबुकच्या एका प्रवक्त्याने अमेरिकी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे तिन्ही माध्यमे एकत्रित येण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु असून ही बरीच मोठी प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे केवळ व्हॉटसअॅप आहे मात्र तुम्हाला फेसबुकवरुन मेसेज करायचा आहे तर तोही या माध्यमातून करता येणार आहे. अशाप्रकारे तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्र आल्यानंतर युजर्ससाठी ही सुखद गोष्ट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे तिन्ही एकत्र झाल्यावर स्पॅम अकाऊंटवर लगाम लागणार असून व्हॉट्सअॅपसारखे अॅप्लिकेशन कोणी वापरत नसेल तरीही त्या व्यक्तीशी संपर्क करता येणार आहे.

First Published on February 6, 2019 2:32 pm

Web Title: facebook whatsapp instagram are merging usage will be easy for users