20 October 2020

News Flash

फॅशन शोचा बदलता रॅम्प!

फॅशन शोमध्ये चर्चा असते ती मॉडेल्स आणि वेगवेगळ्या वस्त्रप्रावरणांची निर्मिती करणारे डिझायनर्सची.

लॅक्मे फॅशन सप्ताहाने सौंदर्याची परिभाषा बदलली; गर्भवती मॉडेल रॅम्पवर

फॅशन शो म्हटले की, रॅम्पवर हळूहळू परंतु नजाकतीने पावले टाकत कॅटवॉक करणाऱ्या उंच, शिडशिडीत, गोऱ्यापान आणि नाकीडोळी सुंदर अशा तरुणी डोळ्यांपुढे येतात. थोडय़ाबहुत फरकाने असेच चित्र सर्व फॅशन शोमध्ये असते. मात्र, फॅशनविश्वात मानाचे स्थान असलेल्या लॅक्मे फॅशन सप्ताहाने मॉडेलिंगच्या या आखीवरेखीवतेची व्याख्या बदलवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या येथे सुरू असलेल्या या फॅशन सप्ताहात चक्क गरोदर मॉडेलला रॅम्पवर उतरवण्यात आले. तसेच सामान्य उंची आणि रंगरूप असलेल्या तरुणींना, ‘आपणही फॅशन शोमध्ये सहभागी होऊ शकतो’, असा आत्मविश्वास या फॅशन सप्ताहाच्या निमित्ताने आला.

फॅशन शोमध्ये चर्चा असते ती मॉडेल्स आणि वेगवेगळ्या वस्त्रप्रावरणांची निर्मिती करणारे डिझायनर्सची. लॅक्मेचा फॅशन सप्ताहही याला अपवाद नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या या सप्ताहाचा तिसरा दिवस गाजवला तो मॉडेल्सनी. त्याची सुरुवात झाली कॅरल ग्रेशियस हिच्यापासून. प्रसिद्ध डिझायनर गौरांग मेहता यांच्या शोमध्ये गरोदर असलेली कॅरल ग्रेशिअस हिरव्या साडीत अवतरली आणि सगळ्या नजरा तिच्याकडे कौतुकाने वळल्या. जुन्या काळाची आठवण देणाऱ्या मोठय़ा बाह्यांचे आणि लांब ब्लाऊज कॅरलने परिधान केले होते. गरोदर असूनही रॅम्पवर तेवढय़ाच ऐटीत आणि आत्मविश्वासाने उतरलेल्या कॅरलने या निमित्ताने मॉडेलिंगसंदर्भातील भ्रामक संकल्पना मोडीत काढल्या.

दीपा गौरानी यांच्या ‘लिव्ह अ‍ॅज वन’ नावाच्या फॅशन शोसाठी मॉडेलची निवड करताना ग्लॅमरची व्याख्याच बदलण्यात आली. तुलनेने सामान्य उंचीच्या तरुणीही रॅम्पवर अवतरल्या होत्या. स्टाइलिस्ट, हेअर ड्रेसर, मेकअप पर्सन अशा पडद्यामागे काम करणाऱ्यांना या शोनिमित्ताने रॅम्पवर मॉडेल म्हणून उतरवण्यात आले. ‘नॉर ब्लॅक, नॉर व्हाइट’ या नावाच्या कलेक्शनसाठी मृगा कपाडिया आणि अमृत कुमार यांनीदेखील मॉडेलिंगचे सर्वमान्य निकष बाजूला सारत आपल्या डिझाइन्समधील प्रयोगांसाठी सर्वसामान्य चेहऱ्यांना मॉडेल म्हणून उभे केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 4:51 am

Web Title: fashion show ramp lakme fashion week
Next Stories
1 लसीकरण न झालेल्या गर्भवती महिलांमध्ये मृत मूल होण्याचा धोका
2 केसांची अस्ताव्यस्त ‘स्टाइल’
3 एचआव्हीचा प्राणघातक संसर्ग रोखणारी लस शोधल्याचा संशोधकांचा दावा
Just Now!
X