सरत्या वर्षांच्या पाटर्य़ा, सुट्टय़ा आटोपल्या की लगेच लक्ष जातं मॉल्समध्ये झळकणाऱ्या मोठय़ाला बॅनर्सवर. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून सगळीकडे ‘सेल’चे बॅनर्स लागलेले असतात. अध्र्याहून कमी किमतीत ब्रँडेड कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी मिळत असताना त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? पण हा सगळा स्टॉक असतो, मागच्या वर्षीच्या. नव्या वर्षांत त्यातल्या बहुतेक गोष्टी आउट ऑफ फॅशन गेलेल्या असतात. त्यामुळे अशा सेल्समधूनही नव्या वर्षांत वापरता येतील अशा वस्तू निवडायच्या असतील, तर ट्रेण्डमध्ये तग धरून कोण राहिलंय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचीच एक उजळणी आज करूयात.

मॉलमध्ये कपडय़ाची खरेदी करताना एखाद्या ड्रेसवर आपली नजर खिळते. ट्रायल रूममध्ये जाऊन फिटिंग वगरे करूनही होतं. रंग, फिटिंग, लुक सगळीच समीकरणं जुळतात. ‘आता हा ड्रेस घ्यायचाच’ इतकं ठरत असतानाच लेबलवरची किंमत पाहून धक्का बसतो. एका ड्रेसच्या किमतीने संपूर्ण महिन्याचं बजेट हलणार असतं. मग ‘बघू सेलमध्ये किंमत कमी झाली तर घेईन,’ असा विचार करत ड्रेस पुन्हा ठेवला जातो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सगळ्या मॉल्समध्ये सेल लागलेले असतात. मोठय़ा ब्रँडचे कपडे अध्र्याहून कमी किमतीत यावेळेस मिळतात. हा काळ शॉपोहोलिक लोकांसाठी सुवर्णकाळच. जास्तीतजास्त सूट मिळविण्यासाठी कित्येक क्लुप्त्या काढल्या जातात. सुट्टीच्या दिवसातली गर्दी टाळण्यासाठी एक दिवस ऑफिसमधून लवकर निघून मॉल गाठायचा. कपडय़ांच्या रॅकजवळ उभं राहून कोणकोणत्या कपडय़ांच्या जोडयांवर जास्तीतजास्त सूट आहे, याचा हिशोब मांडायचा. बिल करताना मुद्दाम आई किंवा मत्रिणीला थोडे कपडे देऊन एक बिल करायचं आणि दुसऱ्या बिलावर जादाची १० टक्क्याची सूट मिळवायची. अशा कित्येक शकला लावल्या जातात.

पण मुळात ही खरेदी करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हा सगळा मागच्या वर्षीचा स्टॉक असतो. नव्या वर्षांत आउट ऑफ फॅशन जाणारा. दुकानांमध्ये नवे कलेक्शन्स लावण्याआधी जुना स्टॉक संपवण्याची ही क्लुप्ती असते. त्यामुळे घरी आल्यावर काही दिवसांनी कळत, खरेदी केलेल्या बहुतेक गोष्टी ट्रेंडमधून गेल्यात. मग त्या कपाटात पडून राहतात. त्यामुळे अशी शॉिपग करताना नव्या वर्षांचा ट्रेंड काय असेल आणि मागच्या वर्षीच पुन्हा नव्या वर्षांत काय वापरू शकतो, हे माहिती असणं गरजेचं आहे. यंदाच्या सेल्समधूनही अशाच नव्या वर्षांसाठी ट्रेंडी गोष्टी तुम्ही कमीतकमी दरात सहज खरेदी करू शकता. पण फक्त काय निवडायचं हे माहिती असलं पाहिजे.

खादी लुक

यंदा खादी लुक बराच चच्रेत होता. सिंथेटिक कापडाऐवजी फॅशन दुनियेनी खादी, कॉटन कापडांचा वापर सुरू केला. नव्या वर्षांतसुद्धा हा ट्रेंड कायम असणार आहे. विशेषत खाकी, मिलिटरी रंगाच्या ट्राऊझर, स्कर्ट्स नव्याने पहायला मिळतील. तुमच्या नेहमीच्या जीन्सना हा मस्त पर्याय ठरू शकतो. सफेद रंगसुद्धा कॉटन ड्रेसेसमध्ये कायम असेल. तसेच एरवी आपल्याला मुंबईमध्ये जॅकेट अभावानेच घालता येतात. पण यंदा कॉटनचे समर जॅकेट आलेले. ते तुम्ही सहज वापरू शकता. तुमच्या शॉिपग बॅगमध्ये या गोष्टी हव्याच.

शिअर ड्रेसिंग

शिअर ड्रेसिंगचा ट्रेंड बराच काळ कायम आहे. अर्थात दरवेळी त्यात थोडे बदल होत असतात. सुळसुळीत, पारदर्शी ड्रेस, शर्ट, टॉप्स, ट्युनिक नव्या वर्षांतसुद्धा पहायला मिळतील. फक्त यांची खरेदी करताना काळा, न्यूड, सफेद, ब्राऊन, नेव्ही असे बेसिक रंग निवडा. ब्राइट रंग शक्यतो टाळा. तसेच ड्रेसवर एम्ब्रोयडरी किंवा छोटी डिटेिलग असेल, तर उत्तम. टॅसल, लेस, स्टड्स लावलेले ड्रेससुद्धा नव्या वर्षांत पहायला मिळतील. अर्थात शिअर ड्रेस घेताना त्यासोबत योग्य इनरची खरेदी करायला विसरू नका.

स्ट्राइप्सची किमया

स्ट्राइप्स म्हणजे उभ्या, आडव्या पट्ट्यांच डिझाइन. फॉर्मल्ससोबत पार्टीवेअरमध्येही यंदा स्ट्राइप्स आवर्जून दिसल्या. फक्त शर्ट नाही, तर ट्राऊझर, स्कर्ट, पलॅझो, ड्रेसवरसुद्धा स्ट्राइप्स छान दिसतात. नव्या वर्षांतसुद्धा या स्ट्राइप्स कायम असणार आहेत. बारीक आणि रंगीत स्ट्राइप ड्रेस किंवा पलॅझो शॉिपग बॅगमध्ये असू द्यात. व्हाइट बेसवरच्या स्ट्राइप्स तर सगळ्यात महत्त्वाच्या. त्यामुळे अशा िपट्रचा ड्रेस चुकवू नकाच. स्ट्राइप्समुळे शरीरयष्टी बारीक आणि उंच दिसते. त्यामुळे त्यांना नाकारण्याचं कारणच नाही.

स्टेटमेंट इअरिरग्स

यंदा वर्षांच्या सुरुवातीला स्टेटमेंट नेकलेसचा ट्रेंड गाजत असतानाच अगदी सरत्या वर्षांत मोठय़ा इअरिरग्सनी अचानक मान वर केली आणि नेकलेसन ट्रेंडमधून बाहेर काढलं. त्त्याचबरोबर यंदा केवळ जीन्स, ट्राऊझरसोबतच नाही तर ड्रेस, स्कर्टसोबतसुद्धा घालायला आरामदायी असलेले स्नीकर्स ट्रेंडमध्ये होते. अगदी सफेद स्नीकर्सपासून ते मेटालिक स्नीकर्सपर्यंत विविध रंग, िपट्रचे स्नीकर्स यंदा पाहायला मिळाले. नव्या वर्षांत हेसुद्धा ट्रेंडमध्ये असणार आहेत.

पँटसूट

यंदा केवळ फॉर्मल्समध्येच नाहीतर पँटसूट पार्टीवेअरमध्येही दिसले. दीपिका पदुकोन, आलिया भट अशा कित्येक सेलेब्रिटीजनी पँटसूट रेड काप्रेटवरसुद्धा मिरविले. नव्या वर्षांतसुद्धा तुम्हाला पँटसूटचा ट्रेंड पहायला मिळेल. ऑफिसला एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी पँटसूट सहज वापरता येईल. पण त्याशिवाय फॉर्मल पार्टीमध्येही ड्रेसला पर्याय म्हणून याचा विचार करता येईल. अर्थी टोनचे एकाच रंगाचे पँटसूट नव्या वर्षांत प्रामुख्याने पहायला मिळतील.

कुठे मिळतील ?

ठाण्याच्या विवियाना, कोरम आदी मॉल्समध्ये सध्या सेल्स चालू आहेत. तिथे ही कलेक्शन्स सहज पहायला मिळतील. साध्या टॉप्सची किंमत १५० रुपयांपासून सुरू होऊन ड्रेस जीन्स २,००० पर्यंत सहज मिळतील.

(समाप्त)