‘फादर्स डे’ (Father’s Day 2019)… आपल्या मराठीत सांगायचं तर पितृदिन! यंदा हा दिवस साजरा होतोय २० जून म्हणजेच आज. कारण दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे जगभर साजरा केला जातो. काहीजण या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात. आपल्या सगळ्यांच्याच यशाच्या मागे जशी आईची माया असते, तसेच ते यश आपल्याला मिळावं यासाठी खंबीर सूत्रधार म्हणून उभे असतात ते म्हणजे आपले बाबा. फादर्स डे साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करणं कोणाला नाही आवडणार? गेल्या दीड वर्षापासून देशात आणि जगभरात करोनाचं संकट उभं आहे. या पार्श्वभूमीवर इतर अनेक सण-उत्सवांप्रमाणेच यंदाही ‘फादर्स डे’ सर्वांनाच फादर्स डे सर्व नियम आणि कुटुंबीयांची काळजी घेऊन साजरा केला जात आहे. बरीच मुलं आपल्या वडिलांसाठी स्वतः फादर्स डे- कार्ड बनवतात, केक बनवतात, तर काही जण मस्त जेवणाचा बेत आखतात किंवा त्यांच्या वडिलांना त्यांच्या प्रेमाचे व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले देतात.

आपले मन, विचारांना आकार देणारे आणि आपल्या इच्छांना व स्वप्नांना पंख देण्यास मोलाचे योगदान देणारे वडीलच असतात. हा दिवस आपल्या वडिलांनी निःस्वार्थपणे आपल्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आणि त्यागांना समर्पित आहे. म्हणून हा दिवस वडिलांचाच सन्मान आणि त्यांच्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित केलेला आहे.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
kesar mangoes in the state entered the market at the end of March Pune news
केशर आंबा यंदा महिनाभर आधीच बाजारात; मुंबई, पुण्यात दर किती ?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

फादर्स डे ची सुरुवात कशी झाली?

अमेरिकेत राहणारी सोळा वर्षांची सोनोरा लुईस डॉड हिची आई अकाली मरण पावली. सोनोरा आणि तिच्या पाच धाकट्या भावांना सांभाळण्याची जबाबदारी डॉडच्या वडिलांवर पडली. डोडच्या वडिलांनी निःस्वार्थपणे आपल्या मुलांची काळजी घेतली. नंतर, सोनोराने ‘फादर्स डे’ साजरा करण्याबाबत याचिका सादर केली. तिला तिच्या वडिलांच्या वाढदिवशी म्हणजे ५ जून या तारखेस आपल्या वडिलांच्या आणि सगळ्यांच्याच वडिलांच्या भूमिकेचा आदर करण्याची इच्छा होती.

मात्र तिची याचिका यशस्वी होऊ शकली नाही. पण असं जरी असलं, तरी सोनोराने स्थानिक चर्च समुदायांना यात सहभागी होण्यासाठी पटवून दिले. तथापि, १९९६ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी जून महिन्याचा तिसरा रविवार म्हणून फादर्स डे साजरा करण्याला मान्यता दिली. पुढच्या अर्धशतकात, सोनोरा डॉडने फादर्स डेच्या वतीने भाषण करून आणि या कारणासाठी प्रचार करत अमेरिकेचा दौरा केला.

कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या, संयमशील, वेळेस तितकेच कठोर होणाऱ्या तमाम पित्यांना जागतिक पितृदिनाच्या ‘लोकसत्ता डॉट कॉम’ कडून शुभेच्छा!