News Flash

प्रतीक्षा संपली! अखेर ‘मेड इन इंडिया’ FAU-G झाला लाँच, कुठून करायचा डाउनलोड? जाणून घ्या डिटेल्स

भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर असणार पहिली स्टेज...

भारतातील गेमप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच झाला आहे. आजपासून हा गेम प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून अँड्रॉइड युजर्स तिथून हा गेम डाउनलोड करु शकतात. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. अखेर हा गेम आता उपलब्ध झाला आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे. अक्षयनेही ट्विटरद्वारे FAU-G लाँच झाल्याची माहिती दिलीये.

भारतीय सैनिकांवर आधारित :-
FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

50 लाखांपेक्षा जास्त डाउनलोड :-
भारतीय युजर्समध्ये FAU-G हा गेम लाँचिंगआधीच लोकप्रिय ठरला आहे. लाँचिंगआधीच या गेमने गुगल प्ले स्टोअरवर जवळपास 50 लाखांहून जास्त प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केल्याची माहिती nCore गेम्सकडून देण्यात आली आहे.

टक्कर कोणाला ?
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:52 pm

Web Title: fau g launched in india on republic day first storyline is based in galwan valley sas 89
Next Stories
1 Microsoft ने उडवली Apple च्या ‘मॅकबूक प्रो’ची खिल्ली, शेअर केला व्हिडिओ
2 जुनी गाडी असलेल्यांना भरावा लागणार Green Tax, नितीन गडकरींनी प्रस्तावाला दिली मंजुरी
3 उद्या लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम, जाणून घ्या काय आहे खासियत
Just Now!
X