02 March 2021

News Flash

आता PUBGला विसरला, नोव्हेंबरमध्ये येतोय FAU-G

अभिनेता अक्षय कुमारने या गेम्सचा टीझर लाँच केला आहे.

PUBG या विदेशी गेमला पर्यायी गेम म्हणून FAU-G हा देशी मेड इन इंडिया गेम लवकरच भारतात लाँच होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने या गेम्सचा टीझर लाँच केला आहे. टीझर लाँच झाल्यानंतर हा गेम कधी लाँच होणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. यावरुन पडदा उठला आहे. नोव्हेंबरमध्ये ही गेम भारतीयांच्या भेटीस येत आहे.

FAU-G गेम तयार करणारी कंपनी NCore Games ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. बंगळुरुमध्ये असणाऱ्या NCore Games या कंपनीनं गेल्या महिन्यात या गेम्सची घोषणा केली होती. भारत सरकारने PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या गेमवर बंदी जाहिर केली होती. FAU-G गेमला फेयरलेस आणि यूनाइटिड गार्ड्स (Fearless and United Guards) या नावानेही ओळखलं जातं. याचा उद्देश चीन विरोधी भावना आणि देशभक्ती वाढवणे असा आहे.

FAU-G गेमच्या टीझरमध्ये गलवान खोऱ्याचं दृष्य दिसत आहे. या खोऱ्यात भारत विरुद्ध चीन युद्ध सुरु आहे. भारतीय सैनिक चिनी सैनिकांवर हल्ला करताना दिसत आहेत. शिवाय भारताचा झेंडा देखील डौलाने फडकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. फैजी हा गेम काही प्रमाणात पब्जीसारखाच आहे. परंतु निर्मात्यांनी भारतीय सैनिकांना केंद्रस्थानी ठेवून या गेमची निर्मिती केली आहे. त्यामुळे या गेममधून मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी २० टक्के नफा भारतीय आर्मीला देण्यात येईल. या गेमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात तरुणांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:23 am

Web Title: fau g launching in november 2020 nck 90
Next Stories
1 Flipkart Big Diwali Sale : या दिवशी पुन्हा धमाका; ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट
2 चिनी ब्रँड शाओमीच्या आठवडाभरात ५० लाख स्मार्टफोन्सची विक्री
3 सुरणाची भाजी आवडत नाही? मग एकदा हे फायदे नक्कीच जाणून घ्या
Just Now!
X