Femina Miss India World 2018: भारतातील सौंदर्याच्या जगतातील ‘फेमिना मिस इंडिया २०१८’ या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारली आहे. तर हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली. गेल्या वर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर ‘मिस इंडिया’चा मुकुट चढवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे मंगळवारी रात्री फेमिना ‘मिस इंडिया २०१८’ ही स्पर्धा पार पडली. सौंदर्य, ग्लॅमर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी अशा वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत माधुरी दीक्षितच्या नृत्याने सर्वांची दाद मिळवली. करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या ३० सौदर्यवतींमध्ये ‘काँटे की टक्कर’ होती. अखेर यात तामिळनाडूच्या अनुकृती वासने ‘मिस इंडिया २०१८’चा किताब पटकावला. तर हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली.

अनुकृतीच्या डोक्यावर मानुषी छिल्लरने मुकूट चढवला. मानुषी छिल्लर, के एल राहुल, इरफान पठाण, बॉबी देओल, कुणाल कपूर, मलायका अरोरा खान, बॉलीवूडमधील ख्यातनाम फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि महिला पत्रकार डिसूझा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. ३० मधून १२ स्पर्धकांची दुसऱ्या फेरीत निवड करण्यात आली. अंतिम फेरीत पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली.

अनुकृती व्यास ही १९ वर्षांची असून ती तामिळनाडूमधील एका महाविद्यालयातून फ्रेंच भाषेत बीए करत आहे. तिला मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असून ती मिस वर्ल्ड २०१८ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Femina miss india world 2018 anukreethy vas from tamil nadu crowned winner
First published on: 20-06-2018 at 03:08 IST