दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरोघरी खरेदीची लगबग सुरू आहे. बाजारही नवनवीन प्रकारचे कपडे, वस्तू आणि आकर्षक सवलतींसह सजला आहे. खरेदीच्या घाईत महिलावर्ग आघाडीवर असला तरी तरुण मुलेही त्यात मागे नाहीत. रणबीर कपूरसारखा कुर्ता, वरुण धवनसारखी धोती अशी यादीही तयार होतेय. त्यांच्या या यादीला मदत म्हणून बाजारातील सध्या ट्रेण्डमधील पुरुषांच्या कलेक्शनवर एक नजर.

शर्ट, टी-शर्ट आणि पँट याच्यापुढे मुलांच्या कपडय़ांची यादी जात नाही. पण, आता जमाना या यादीच्या पुढे कधीच गेला आहे. त्यामुळे यंदा खास फेस्टिव्हल सिझनसाठी बाजारात काय नवं आलं आहे, यावर तेही नजर फिरवत आहेत. अगदी बॉलीवूड स्टाइल फेस्टिव्ह लुकपासून ते थेट पारंपरिक लुकपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मेन्सवेअर कलेक्शन्स सध्या बाजारात आले आहेत.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

ट्रेण्डी जॅकेट्स आणि वेस्ट्स

नेहरू जॅकेट कधीच ट्रेण्डमधून जात नाही. यंदाच्या सीझनमध्ये पिंट्रेड, शॉर्ट नेहरू जॅकेट्स प्रामुख्याने पाहायला मिळतील. ही जॅकेट्स स्ट्रेट पँटवर सहज वापरू शकता. सध्या नेहरू जॅकेटसोबत पटियाला, धोती पँट घालायचा ट्रेण्ड आहे. तोही या दिवाळीत नक्की ट्राय करू शकता. मुंबईमध्ये अगदी मागच्या आठवडय़ापर्यंत दबा धरून बसलेला पाऊस आणि सध्या अंगाची लाही करणारा उन्हाळा यामध्ये हिवाळा कुठे तरी गायबच झालाय. त्यामुळे जॅकेट्ससारखे प्रकार इथे क्वचितच वापरता येतात. पण लेअिरगसाठी यंदा वेस्ट्सचा पर्याय वापरता येईल. वेस्ट हे मुख्यत्वे थ्री पीस सूट सोबत घालतात. पण एखाद्या पिंट्रेड किंवा प्लेन कुर्त्यांवर छान कलरफुल वेस्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता. पेस्टल शेड्सच्या कुर्त्यांसोबत नेव्ही ब्ल्यू, राखाडी, काळा, वाईन रंगाचे वेस्ट वापरता येतील. सध्या सेल्फ कलर पिंट्रचे वेस्ट बाजारात आले आहेत. ते सणांच्या काळात नक्कीच घालता येतील. एखाद्या सेमी-फॉर्मल पार्टीसाठी सूटसोबतही हे वेस्ट वापरू शकता. वेस्ट किंवा मोदी जॅकेट्सची खासियत म्हणजे हे स्लीव्हलेस असतात. त्यात जादाचे पॅडिंग नसते, त्यामुळे गरम होण्याचा प्रश्न नसतो.

स्टायलिश दुपट्टे

दुपट्टे हा तसा मुलींचा प्रांत. पण यंदाच्या सीझनमध्ये मुलांसाठीही वेगवेगळ्या स्टाइलचे दुपट्टे बाजारात आले आहेत. कुर्ता, धोती आणि एखादा दुपट्टा म्हणजे यंदाचा परफेक्ट फेस्टिव्हल लुक. आर्ट सिल्क, सिल्क, टफेटा, लिनिन, जॉर्जेटचे दुपट्टे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या कुर्त्यांला साजेसा दुपट्टा तुम्ही निवडू शकता. फ्लोरल बॉर्डर असलेले दुपट्टेसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत.

स्ट्रेट सलवार आणि धोती पँट

एरवी जीन्स, ट्राऊझरच्या प्रेमात असलेली मुलं सणांच्या दिवसात आवर्जून सलवार, धोती अशी वेगळी वाट चोखाळतात. त्यामुळे बाजारातसुद्धा पतियाला, जोधपुरी पँट, धोती पँट, स्ट्रेट सलवार, कॉटन पँट असे वेगवेगळे पर्याय सध्या पाहायला मिळताहेत. क्रीम, सफेद, बिस्कीट, मरून, नेव्ही, मेहंदी, ब्राऊन, काळा अशा वेगवेगळ्या रंगांतील या पँट्स तुम्ही वेगवेगळ्या कुर्त्यांसोबत वापरू शकता. सध्या फिटेड पँट्सपेक्षा घेरेदार पँट्स अधिक पसंत केल्या जात आहेत.

मॅचिंग ड्रेसिंगचा फंडा

यंदा मुलींप्रमाणेच मुलांच्या ड्रेसिंगमध्येसुद्धा मॅचिंग ड्रेसिंग ट्रेण्डमध्ये आहे. एकाच रंगाच्या एक किंवा दोन शेड्सचा वापर करून ड्रेसिंग केलं जातं. त्यामुळे तुमचा कुर्ता, सलवार निवडताना त्यांचं मॅचिंग तपासून घ्या. तसेच तो रंग तुमच्या स्किन टोनला साजेसा असेल याचीही खात्री करा. अर्थी टोन्स तसे सगळ्या स्किन टोनला खुलून दिसतात. त्यामुळे यंदा ते ट्रेण्डमध्ये आहेतच. पण त्याशिवाय रॉयल ब्ल्यू, मॅट ऑरेंज, पिंक, मस्टर्ड यल्ले, राखाडी हे रंग आवर्जून वापरा.

शॉर्ट कुत्रे आणि लिनन शर्ट

फॅन्सी पँट, जॅकेट्ससोबत पेअर करण्यासाठी सोयीचे जावे म्हणून यंदा कुत्रे मात्र सिंपल आहेत. लिनिनच्या स्ट्रेट फिट शर्ट्स, कुर्त्यांना यंदा जास्त पसंती आहे. तसेच सिल्कचे सेल्फ पिंट्रचे कुत्रेही बाजारात पाहायला मिळतात. खादीचे कुत्रेही या दिवाळीत वापरू शकता. तसेच टाय डाय पिंट्र, फ्लोरल पिंट्रचे शर्ट यंदा वापरून पाहा. सध्या हाफ स्लीव्ह आणि थ्री-फोर्थ स्लीव्हचे कुत्रे ट्रेण्डमध्ये आहेत. कुर्त्यांमध्ये पेस्टल शेड्स ट्रेण्डमध्ये आहेत. त्याशिवाय मरून, चॉकलेट ब्राऊन, नेव्ही अशा अर्थी टोन्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. पण ब्राइट रंगांच्या फंदात पडू नका.

कुठे मिळतील?

दादर, परेल, बोरिवली, अंधेरी येथील खास सणासुदीच्या कपडय़ांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांमध्ये हे कपडे उपलब्ध आहेत. सध्या मॉल्समध्येही फेस्टिव्ह कलेक्शन्स लागली आहेत. या कपडय़ांच्या किमती साधारणपणे ५०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंतच्या घरात जातात.