सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार कंपन्यांना आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरूवात केली आहे. आपल्या कंपन्यांच्या कार खरेदी कराव्या यासाठी कंपन्या नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. सध्या होंडा या कार उत्पादक कंपनी आपल्या गाड्यांवर तब्बल अडीच लाखांपर्यंतची सूट देत आहे. सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. होंडा सिटी, अमेझ, सिविकसह अनेक गाड्यांवर ही ऑफर देण्यात येत आहे. अधिकृत डिलर्सकडून ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंतच ही ऑफर सुरू राहणार आहे.

होंडा ग्राहकांसाठी ही ऑफर नव्या गाड्यांवर कॅश डिस्काऊंट, एक्सटेंडेट वॉरंटी, होंडा केअर प्रोग्राम अंतर्गत दिली जाणार आहे. सध्या ज्यांच्याकडे होंडाच्या गाड्या आहेत त्यांनी त्या विकून पुन्हा होंडाची गाडी घेतल्यास त्यांना लॉयल्टी बोनस आणि अन्य ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना अन्य सुविधाही देत आहे. कंपनीनं अनेक बँकांच्या मदतीनं ग्राहकांना १०० टक्के ऑन रोड किमतीवर कर्ज, कमीतकमी ईएमआय आणि मोठ्या कालावधीसाठी कर्ज अशा अनेक सुविधा दिल्या आहेत.

कंपनी होंडा अमेजवर ४७ हजार रूपयांपर्यंतची सूट देत आहे. तर 5th जेन होंडा सिटीवर ३० हजार रूपये, होंडा जॅझवर ४० हजार रूपये, होंडा डब्ल्यू आर व्हीवर ४० हजार रूपये आणि होंडा सिविकवर २ लाख ५० हजार रूपयांपर्यंतची सूट देत आहे. करोना महासाथीच्या काळात ग्राहकांचा स्वत:च्या गाड्या घेण्याकडे कल वाढला असून मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना या ऑफर्स नक्कीच आवडतील अस मत होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक, विपणन आणि विक्री राजेश गोयल यांनी व्यक्त केलं.