व्यावसायिक पदवी मिळवण्यापासून उपजीविका कमावण्यापर्यंत आजची नारी कोणावरही आश्रित राहिलेली नाही. आज घराच्या एकूण मिळकतीमध्ये कमावत्या स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो आणि अनेकदा तर त्या कुटुंबाच्या एकमेव कमावत्या सदस्यसुद्धा असतात. पण कधी-कधी याचा अर्थ असा होतो की त्यांना वैयक्तिक आकांक्षा सोडून आणि अनेकदा तर आर्थिक सुरक्षा सोडून सुद्धा जबाबदारी घ्यावी लागते. आज आपण पाहू की या स्त्रियांना कशा समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांनी कशाप्रकारे सामोरे जायला हवे.

अविवाहित एकटी कमावती स्त्री –

अविवाहित कमावत्या स्त्रिया बहुतांश वेळा स्वतःऐवजी आई-वडिलांची आणि लहान भावंडांची आर्थिक सोय आधी पाहातात. काही तर आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या लग्नाचा किंवा उच्च शिक्षणाचा विचारसुद्धा पुढे ढकलत असतात.

त्यांनी काय करावे?

कुटुंबाचे हित जपणे महत्वाचे आहेच. तरीही लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी असलात तरच तुमचे कुटुंब आनंदी राहील. सते. उर्वरित मिळकत तुम्ही तुमच्या कौटुंबिक गरजा, बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरू शकता. नीट म्हणूनच महिन्याच्या सुरूवातीलाच स्वतःच्या गरजांसाठी काही पैसा बाजूला काढून ठेवणे उत्तम अनियोजन करा आणि त्याप्रमाणेच वागा.

कमावती विवाहीत स्त्री –

अशा स्त्रियांसाठी परिस्थिती अधिक अवघड असू शकते, कारण त्यांना करिअरसोबत घराकडे लक्ष द्यावे लागते. त्यात जर तुम्ही आई असलात, तर मातृत्वाच्या जबाबदाऱ्या सर्वात आधी असतातच. आर्थिक जबाबदारीमुळे घराच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. घराच्या जबाबदाऱ्यांसाठी आपल्या जोडीदाराची साथ घेणे केव्हाही योग्यच, तरीही तुम्ही स्वतःचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय सर्व मिळकत घरासाठीच वापरणे योग्य नाही.

विवाहित स्त्रिया खालील प्रकारे त्यांचे अर्थकारण सुरळीत ठेवू शकतात.

मिळकतीची वाटणी: तुम्ही आपल्या पतीसोबत बसून मासिक मिळकत कशी वापरली जाईल याचा स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे. जर तुम्ही घरगुती खर्च मिळून करण्याचे ठरवले, तर कोण कसा खर्च करेल याचे प्रमाण स्पष्ट असले पाहिजे. जर पतीने घराचा सर्व खर्च करण्याचे ठरवले असले, तर पत्नीची मिळकत स्वतः आणि मुलांसाठी बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

एचआरएचे फायदे आणि गृह कर्ज: घर भाड्याचे असले तर टॅक्सची कमाल बचत करण्यासाठी भाडे दोघांनी मिळून भरले पाहिजे. एचआरएचा क्लेम करताना तुम्ही भाड्याच्या रकमेची अशा प्रकारे विभागणी करू शकता ज्याने त्यातून दोघांनाही कमाल फायदा मिळू शकेल. ही विभागणी पती आणि पत्नी दोघांच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे करता येईल. गृह कर्ज असले, तर दोघे जोडीदार करलाभ घेण्यासाठी त्यात सह-अर्जदार आणि घराचे सह-मालक असू शकतात. अशाने दोघांनाही गृह कर्जावरील व्याजावर वर्षाकाठी २ लाख रुपये आणि मुदलावर १.५ लाख रुपये एवढी वजा करता येईल.

आरोग्य विमासारख्या इतर गुंतवणुकींसाठी: जर दोघे जोडीदार नोकरदार असतील आणि आरोग्य विमा प्रीमियमवर टॅक्स लाभ घेऊ इच्छितात, तर त्यांनी निराळी आरोग्य विमा पॉलिसी घेतलेली बरी. किंवा एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेऊन टॅक्स लाभांसाठी प्रीमियमची विभागणी करून घ्यावी. सह-नावाने केलेल्या गुंतवणुकींवर टॅक्स वजा करुन क्लेम करताना आधी एखाद्या टॅक्स तज्ञाचा सल्ला घ्या. महिलांनी कार्यक्षेत्राचा चांगला ताबा घेतलेला आहे. आता वेळ आहे त्यांनी भवितव्य सुंदर करण्यासाठी समजुतदारीने आणि सुज्ञपणे पाऊले उचलण्याची.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार