News Flash

सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे?

या पाच पद्धतीने सिंगल मदर आर्थिक नियोजन करू शकतात

संग्रहित छायाचित्र

– अंजली नायर

आपण ऐकले आहे की एकट्या आई होण्याचे काम दुप्पट आहे, दुप्पट जबाबदारी आणि तेवढेच दुप्पट ताणतणाव.  आर्थिक व्यवस्थापन स्वतः एकट्याने करणे एक खूप मोठे कठीण टास्क आहे आणि एकट्या आईसाठी हे अधिक कठीण होऊन जाते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सिंगल मदरने कशाप्रकारे आपले आर्थिक व्यवस्थापन करावे या संदर्भात टिप्स देत आहोत त्या खालील प्रमाणे.

१. उद्दिष्टेः अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची व्याख्या करुन स्पष्टता मिळू शकते. या उद्दीष्टांच्या आधारे गुंतवणुकीचे विभाजन करून सिंगल मदरला, योग्य ती दिशा मिळू शकेल जसे कि,  आपल्या मुलाच्या खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करणे. गुंतवणूकी अशा प्रकारे केली पाहिजे की यामुळे उत्पन्नाचा स्वयंचलित स्थिर प्रवाह राहिला पाहिजे उदा. स्थिर रिटर्न एसआयपीमध्ये गुंतवणूक इ.

२. ट्रॅकर्स: खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च व इन्कम ट्रॅकर्स संबंधित अनुप्रयोगांचा उपयोग करणे. जपून खर्च करणे हि आर्थिक व्यवस्थापनासाठी महत्वाचा गुरुकिल्ली आहे.

३. आकस्मित निधी: एक आकस्मित निधी तयार करणे ही पहिली पायरी असावी जे सिंगल मदर अनपेक्षित आणि आकस्मिक होणाऱ्या दुर्घटनेसाठी त्या खर्चातून मदत होईल. त्यामुळे दैनंदिन आर्थिक योजनेवर परिणाम होणार नाही.

४. शासकीय सहाय्य: अशा महिलांसाठी सरकार कडून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना आहेत. जसे कि, महिलांच्या बचत बँक खात्यावर रोख रक्कम, विशेष वैद्यकीय विमा योजना, अनुदानित गृह कर्ज इत्यादीं.

५. विम्याचा आधार: चांगल्या विमा योजनांमध्ये गुंतवणूकीमुळे जोखीमांमध्ये आयुष्यभर एक प्रकारे आधार मिळते. आजच्या काळातील आजारांच्या काळात अनेक तज्ञांनी आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे.  आई-वडील अशी दोघांची ही भूमिका निभावणे अजिबात सोपे नाही. तर, या ड्युअल रोल प्लेयर्ससाठी थोडासा आर्थिक सल्ला थोडा दिलासा देणारा नक्कीच ठरू शकतो!

(लेखिका आयटीएम व्यावसायिक विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2020 4:01 pm

Web Title: financial tips for single mothers nck 90
Next Stories
1 ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा पहिला ‘सेल’, थोड्याच वेळात झाला ‘आउट ऑफ स्टॉक’
2 लॉकडाउनमध्ये घरबसल्या शिकू शकता ‘हे’ ऑनलाइन कोर्सेस
3 OnePlus 8 खरेदी करण्याची पुन्हा संधी, ‘सेल’मध्ये मिळतायेत अनेक शानदार ऑफर
Just Now!
X