मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी अंधांसाठी बोटाला लावून वाचता येईल असे यंत्र तयार केले असून त्यात कॅमेऱ्याचा समावेश आहे. हा कॅमेरा लिहिलेल्या मजकुराचे रूपांतर ध्वनीत करतो त्यामुळे अंधांसाठी हे उपकरण वरदान ठरणार आहे.
या यंत्राच्या मदतीने अंध व्यक्ती ज्या मजकुराच्या दिशेने बोट दाखवेल त्याचे रूपांतर ध्वनीत केले जाईल व त्यामुळे एक प्रकारे वाचून देण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. रॉय शिलक्रॉट या मीडिया, आर्ट्स अँड सायन्सेसच्या विद्यार्थ्यांने त्याच्या सहकाऱ्यासमवेत हे यंत्र तयार करून त्याची चाचणी स्वयंसेवक बनलेल्या अंध व्यक्तींवर केली आहे.
 या यंत्रात दोन हॅप्टिक मोटर्स असून एक बोटाच्या वरच्या बाजूला तर एक खाली असते. मोटारीतील कंपनांमुळे व्यक्तीने तिचे बोट उंचावले आहे किंवा त्या मजकुरावर ठेवले आहे हे यंत्राला समजते.  दुसरे एक यंत्र तयार केले त्यात मोटारींचा वापर केलेला नाही, तर ध्वनीच्या रूपात प्रतिसाद मिळतो. मजकुराच्या ओळीवरून अंध व्यक्तीचा हात दूर जाऊ लागला तर संगीताचा आवाज वाढत जातो त्यामुळे त्या व्यक्तीला नेमका मजकूर कुठे आहे हे समजते. मोटर्स व म्युझिकल टोन या दोन्हींची एकत्रित चाचणीही घेण्यात आली आहे.यातील कुठल्या प्रकारचा प्रतिसाद उपयुक्त आहे याबाबत मतभेद आहेत पण ध्वनिचा प्रतिसाद महत्त्वाचा असल्याचे संकेत आहेत. या यंत्रात लहान व कमी वजनाचे संवेदक वापरले आहेत. कॅमेऱ्याच्या व्हिडिओ वेगाची प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी यात अलगॉरिथमचा वापर केला असून तो अलगॉरिथम हा शिलक्रॉट व त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे.
जेव्हा अंध व्यक्ती नवीन ओळीवर बोट ठेवते तेव्हा हा अलगॉरिथम  अक्षरे बरोबर ओळखतो. अनेक ओळींचा मजकूर हा ध्वनीत रूपांतरित केला जातो; फक्त त्या व्यक्तीने बोटे एकाच दिशेने फिरवायची आहेत. वापरकर्ता जेव्हा उजवीकडे बोट ठेवतो तेव्हा प्रत्येकवेळी मजकुराची नवी व्हिडिओ बनते त्यामुळे अलगॉरिथमवर ताण येत नाही. बोटाला लावलेल्या यंत्रातील अलगॉरिथम प्रथम बोटांशी संपर्क असलेल्या लॅपटॉपमध्ये वापरण्यात आले. संगणक विज्ञानातील विद्यार्थी मारसेल पोलॅन्को व मायकेल चँग यांनी सॉफ्टवेअरवर आधारित प्रणाली तयार केली असून अँड्रॉइड फोनच्या मदतीने अंध व्यक्तींना मजकूर वाचता येतो.

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना