लग्न हा आयुष्यातला असा क्षण आहे जेथे आपलं सुख-दु:ख शेअर करण्यासाठी आपल्याला हक्काचा माणूस मिळतो. अनेक नातेसंबंध जोडले जातात. एका अर्थाने परिपूर्ण कुटुंब तयार होण्यास सुरुवात होते. लग्न ही आयुष्यात अविस्मरणीय गोष्ट आहे. त्यामुळे हा लग्नसोहळा चांगला व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातच सध्या डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना अस्तित्वात आली आहे. या डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना केवळ तरुणाईलाच नाही तर त्यांच्या पालकांनाही आवडू लागली आहे. मात्र हा लग्नसोहळा केवळ परदेशातच होतो असा समज असणारे इच्छा असूनही या पर्यायाकडे पाठ फिरवतात. परंतु डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशात जाण्याची मुळीच गरज नाही. आपल्याच देशात अशी सुंदर ठिकाणं आहेत कि जेथे गेल्यावर तुमचा लग्नसोहळा अविस्मरणीय होईल.

१. राजस्थान – राजस्थान हे भारतातील असं ठिकाणं आहे. जेथे विशिष्ट प्रकारची आपुलकी आहे. राजस्थानला येणारा प्रत्येक व्यक्ती या जागेच्या प्रेमात पडतो. अनेक जणांना चित्रपटात दाखविल्याप्रमाणे राजेशाही थाटात लग्न करण्याची इच्छा असते. अशा व्यक्तींनी राजस्थान हा पर्याय नक्कीच निवडावा. राजस्थानमधील मोठमोठ्या हवेल्या, पॅलेस हे आपल्याला आकर्षित करत असतात. त्यामुळे या ठिकाणी लग्न करण्याची नक्कीच इच्छा होईल. अशातच जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी जागा शोधत असाल तर राजस्थान हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे केवळ लग्नासाठी हवेली, पॅलेस भाड्याने उपलब्ध होतात. तसेच संगीत, मेहंदी या कार्यक्रमांसाठी खास आयोजनही करण्यात येते. अनेक कपल्सकडून राजस्थानमधील उदयपूर, जयपूर या ठिकाणांना पसंती देताना पहायला मिळतं. त्यातच जोधपूर, रनबांका पॅलेस हेदेखील विवाहासाठी उत्तम ठिकाणं आहेत.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

२. अंदमान-निकोबार – अनेक कपल्स लग्नानंतर हनीमुनसाठी अंदमान-निकाबोर या द्विपसमुहाची निवड करतात. मात्र हे ठिकाण केवळ हनीमुन किंवा पिकनिकचे ठिकाण नाही तर येथे विवाहसोहळेही संपन्न होतात. निळ्याशार समुद्राच्या मध्योमध आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर सात फेरे घेण्याची इच्छा असेल तर अंदमान-निकोबार ही चांगली निवड आहे. तसेच येथे रोस आइसलॅड किंवा हेवलॉक या ठिकाणांना डेस्टिनेशन वेडिंगसाठी खास पसंती दिली जाते.

३.गोवा – परिपूर्ण ठिकाण म्हणजे गोवा. गोवा केवळ पर्यटन ठिकाण असल्याचा गोड गैरसमज अनेक जणांना असतो. मात्र आता हे विसरा. कारण गोवा केवळ पर्यटन ठिकाण न राहता डेस्टिनेशन वेडिंगमधील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. समुद्राच्या साक्षीने लग्न व्हावे अशी इच्छा असणा-यांनी गोव्याची आवश्य निवड करावी. तरुणाईमध्ये या जागेला विशेष पसंती देण्यात येते. गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये बीच वेडिंग,गार्डन वेडिंग किंवा सनसेट वेडिंग असे पर्याय उपल्बध आहेत. तसेच येथे संगीत, मेहंदी यासारखे कार्यक्रम करण्यासही परवानगी देण्यात येते.

४. केरळ – पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे केरळ. केरळमध्ये अजूनही लग्न पारंपारिक पद्धतीने करण्यात येतात. पारंपारिक वाद्यांच्या साक्षीने जर लग्न करायचं असेल तर केरळचा पर्याय नक्कीच निवडा. गोव्याप्रमाणेच येथेही बीच,रिसोर्ट यासारख्या ठिकाणी लग्न करता येतं. सध्या केरळमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वेडिंग प्लॅनरदेखील लग्नासाठी वेगवेगळ्या थीम ठेवतात. यामध्ये एलिफंटा थीम ही सर्वाधिक लोकप्रिय आहे. यामध्ये नवरदेवाची एंट्री हत्तीवरुन होते. तसेच जेवतांनाही खास केळीच्या पानात वाढले जाते.

५.लवासा- लवासा हे नाव ऐकताच पार परदेशात गेल्यासारखं वाटतं असेल ना ? पण जरा थांबा हे ठिकाण कुठे परदेशात नाही तर अगदी आपल्या जवळ आहे. म्हणजे मुंबईपासून तर केवळ ३-४ तासांच्या अंतरावर. पुण्याजवळ लवासा हे हिल स्टेशन आहे. याठिकाणी पर्वत, नद्या, धबधबा असे नैसर्गिक गोष्टींचा अगदी भडीमार आहे. त्यामुळे रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून वेळ काढत आपले अविस्मरणीय क्षण जपून ठेवायचे असतील तर लग्नासाठी लवासाचा विचार नक्कीच व्हायला हवा. त्यामुळे जर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय असेल तर आपल्याच देशातील या ठिकाणांचा आवर्जुन विचार करा.