News Flash

Redmi Note 5 Pro चा फ्लॅश सेल आज, नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याची संधी

Xiaomi चा दमदार स्मार्टफोन Redmi Note 5 Pro या फोनचा फ्लॅश सेल आज दुपारी...

Xiaomi चा दमदार स्मार्टफोन Redmi Note 5 Pro या फोनचा फ्लॅश सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट आणि MI च्या अधिकृत संकेतस्थळावर हा सेल सुरू होणार असून सेलमध्ये फोनचे सर्व व्हेरिअंट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय ग्राहकांना हा फोन नो कॉस्ट इएमआयवरही खरेदी करता येणार आहे.

अॅक्सिस बॅंकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास फोनवर 10 टक्के सूट दिली जात आहे. Reliance Jio देखील या फोनवर 2200 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. सेलमध्ये 14 हजार 999 इतकी फोनची सुरूवातीची किंमत ठरवण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन –
फोनमध्ये 5.99 इंच डिस्प्ले (1080×2160 पिक्सल) आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसरसह येणारा हा शाओमीचा पहिला फोन आहे. 4 GB आणि 6 GB रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये फोन उपलब्ध असून यामध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. रेडमी नोट 5 प्रोमध्ये 12 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा ड्यूअल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. अॅन्ड्रॉइडच्या 8.0 ओरियोवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 11:39 am

Web Title: flash sale of redmi note 5 pro on flipkart and mi site
Next Stories
1 अशाप्रकारे लहानपणापासूनच जपानमध्ये दिले जातात सार्वजनिक स्वच्छतेचे धडे!
2 प्लास्टिकबंदी: दंडवसुलीवर आधारित ‘कॅरी ऑन! व्हिडिओ’ व्हायरल
3 तब्बल 8 जीबी रॅम आणि दमदार फिचर्स , Asus ZenFone 5Z आज होणार लॉन्च
Just Now!
X