News Flash

Flashback 2019 : गुगलने बंद केल्या ‘या’ 10 सर्व्हिस

घटलेली लोकप्रियता आणि डेटा चोरीच्या संशयातून कंपनीने...

जगातील अग्रगण्य टेक कंपनी Google ने 2019 वर्षात जवळपास दहापेक्षा अधिक अ‍ॅप्स, फीचर्स आणि प्रोडक्टस बंद केलेत. घटलेली लोकप्रियता आणि डेटा चोरीच्या संशयातून कंपनीला हे अ‍ॅप्स किंवा प्रोडक्ट्स बंद करावे लागले. आज आम्ही तुम्हाला गुगलने 2010 मध्ये बंद केलेल्या 10 सर्विसेज आणि प्रोडक्ट्सविषयी सांगणार आहोत.

1. Google Allo
गुगल कंपनीने इंटरनेट बेस्ड मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन Google Allo बंद केले आहे. हे अ‍ॅप 2016 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. या सर्विसला गुगल चॅट नावाने देखील रिब्रँड करण्यात आले होते. पण 12 मार्च 2019 रोजी ही सर्विसही बंद करण्यात आली.

2. Chromecast Audio
गुगलने क्रोमकास्ट ऑडिओ हार्डवेअर प्रोडक्ट देखील बंद केले आहे. 2015 मध्ये हे प्रोडक्ट लाँच केले होते. या प्रोडक्टच्या मदतीने युजर्स कोणत्याही डिव्हाईसद्वारे स्पीकरमध्ये ऑडिओ प्ले करू शकायचे.

3. गुगल ट्रिप्स –
ट्रॅव्हलिंगची आवड असणाऱ्यांना हे अ‍ॅप फायदेशीर होते. यावर फ्लाइट्स, हॉटेल, कार आणि रेस्टॉरंट रिझर्वेशन सुविधा मिळत असे. तीन वर्षे जुनी ही सर्विस देखील गुगलने बंद केली आहे. त्याऐवजी ट्रॅव्हलिंग संबंधित माय ट्रिप्स नावाचं एक पेज गुगलने सुरू केलं आहे.

4. Youtube Messages-
व्हिडीओ मेसेजिंग फीचर 2017 मध्ये आणलं होतं. याद्वारे युजर्स व्हिडिओ शेअरिंगसह मेसेज देखील करु शकत होते.

5. YouTube Gaming –
गुगलने यूट्यूब गेमिंग सर्व्हिस 2015 मध्ये लाँच केली होती, पण अधिक लोकप्रियतना न मिळाल्याने कंपनीने ही सर्व्हिस देखील याच वर्षी बंद केली.

6. Areo –
गुगल कंपनीने Areo अ‍ॅप भारतात दोन वर्षांपूर्वी लाँच केलं होतं. याद्वारे युजर्स आवडीच्या हॉटेलमध्ये टेबल बुक करु शकत होते, तसेच खाद्यपदार्थही ऑर्डर करता येत होते. पण लोकप्रियता न मिळाल्याने कंपनीने हे अ‍ॅप देखील बंद केलं आहे.

7. Google URL shortner –
गुगलच्या या फीचरचा वापर कोणतेही युआरएल शॉर्ट(कमी) करण्यासाठी वापरलं जायचं. कंपनीने हे फीचर 9 वर्षांपूर्वी लाँच केलं होतं.

8. Google+
जवळपास 5 कोटी युजर्स गुगलची ही सोशल नेटवर्किंग सेवा वापरत होते. पण अन्य स्पर्धकांची लोकप्रियता अधिक वाढल्याने आणि युजर्सकडून कमी वापर होत असल्याने कंपनीने ही सेवा याच वर्षी बंद केली.

9.Google Inbox
गुगल इनबॉक्स ही सेवा पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये लाँच करण्यात आली होती. जीमेल वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही सेवा बंद करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

10. Google Daydream
गुगल कंपनीने virtual reality platform डे-ड्रीम 2016 मध्ये लाँच केले होते. पण युजर्सना पाहिजे तसा प्रतिसाद कधीच न मिळाल्याने कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीलाच ही सेवाही बंद केली. याशिवाय कंपनीने Google Cloud Messaging ही सेवा देखील बंद केली आहे. या सेवेचा वापर केवळ अँड्रॉइड आणि क्रोमवरच करता येत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2019 4:22 pm

Web Title: flashback 2019 gogle has stopped these ten services sas 89
Next Stories
1 २४ वर्षीय तरुणीने BMW आणि घर भेट देत प्रियकराला घातली लग्नाची मागणी
2 इअरफोनच्या किंमतीत लाँच झाले pTron Wireless Earbuds, किंमत फक्त…
3 Mi No. 1 Fan Sale : ‘शाओमी’चा आजपासून सेल, अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट
Just Now!
X