ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या प्लॅटफॉर्मवरील फर्निचरच्या श्रेणीचा आणखी विस्तार करत ‘फ्लिपकार्ट परफेक्ट होम्स ज्युनिअर’ या श्रेणीच्या लाँचिंगची घोषणा केली. भारतातच बनवलेल्या या फर्निचरमध्ये खास लहान मुलांसाठीचे बेड्स, स्टडी डेस्क्स, किड्स सीटींग/टेबल आणि चेअर सेट, तसेच स्टोअरेज/वॉर्डरोब्ज यांचा समावेश आहे.

नव्या सेवेद्वारे कंपनीने २ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी खास फर्निचर उपलब्ध केले आहे.  ‘मुलांना त्यांची स्वतंत्र जागा व फर्निचर उपलब्ध करून दिल्यास त्यांना अधिक स्वतंत्र असल्यासारखे वाटते, असे अभ्यासातून दिसून आले आहे. त्या आधारे Flipkart Perfect Homes Junior या श्रेणीअंतर्गत मुलांसाठी फर्निचरचा केवळ आकार कमी न करता खास त्यांच्यासाठी फर्निचरची रचना करण्यात आली आहे’, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मुलांसाठीच्या या श्रेणीत भरपूर स्टोअरेज जागा व दिसायला देखण्या अशा उपयुक्त, चैतन्यदायी आणि उच्च गुणवत्तेच्या फर्निचरचा समावेश आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत ‘परफेक्ट होम्स ज्यूनिअर रेंज’ विकसित करण्यात आली असून यामध्ये वर्तुळाकार कोपरे, घातक रसायनांचा वापर न करणे, मजबूत, हाताला चिमटा बसणार नाही अशा प्रकारची रचना आणि टिकाऊपणाचे प्रमाणपत्र आदी बाबींची काळजी घेण्यात आली आहे.

“मुलांसाठी फर्निचरची खरेदी करताना भारतीय पालकांना असलेल्या आकांक्षा, त्यांच्या गरजा आणि चिंता या सर्वांची आम्हाला कल्पना आहे. पैशांचे योग्य मोल मिळावे आणि गुणवत्तेसाठी ते दक्ष असतात. सुरक्षितता आणि उपयुक्तता या त्यांच्या लेखी महत्त्वाच्या बाबी असून फ्लिपकार्ट परफेक्ट होम्स ज्यूनिअर श्रेणी त्यांच्या या अपेक्षांची पूर्तता करेल. विशेषत: सध्याच्या काळात सर्वांना घरात राहावे लागत असताना पालक आपल्या मुलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ पाहात असल्यामुळे या विस्तारासह आम्ही ऑनलाइन फर्निचर क्षेत्रातील आमच्या उत्पादनांचे अधिक बळकटीकरण करत आहोत.”, असे यावेळी फ्लिपकार्टच्या प्रायव्हेट लेबल्सचे उपाध्यक्ष देव अय्यर म्हणाले.