ई-कॉमर्स वेबसाइट कायमच आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेलचे आयोजन करतात. अशाचप्रकारे फ्लिपकार्टने चार दिवसांचा ‘Apple day sale’ सेलचे आयोजन केले असून आज या सेलचा दुसरा दिवस आहे. २७ फेब्रुवारीपासून सुरु झालेला हा सेल २ मार्चपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहकांना अॅपलचे फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे अॅपलचा मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने खूशखबर आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अ‍ॅपल वॉचवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला जात आहे.

या आहेत ऑफर्स…

आयफोन एक्स – सेलमध्ये आयफोन एक्सच्या ६४ जीबीचा ८९,००० रुपयांचा फोन ८२, ९९९ रूपयांना मिळत आहे. तर २५६ जीबी व्हेरिएंट १,०२,००० रुपयांचा फोन ९७,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस – आयफोन ८ चा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड फोन ५४,९९९ रूपयात, तर २५६ जीबीचा फोन ६९,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्डन रंगाचा फोन ६४,९९९ रूपयात, आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर फोन ६५, ९९९ रूपयात उपलब्ध आहे. तर आयफोन ८ प्लस २५६ जीबीचा फोन ७९, ९९९ रूपयात मिळेल.

आयफोन ७ – ३२ जीबी फोनचा ब्लॅक आणि रोज गोल्ड रंगाचा हा फोन ४१, ९९९ रूपयात मिळतो आहे. आयफोन ७ चा ३२ जीबीचं गोल्ड आणि सिल्वर व्हेरिएंट ४२, ९९९ आणि ४३, ९९९ रूपयात मिळत आहे. आयफोन ७ चा १२८ जीबीचा फोन ५५, ९९९ रूपयांना मिळेल. आयफोन ७ प्लसचं ३२ जीबी व्हेरिएंट ५६, ९९९ रूपयात, तर आयफोन ७ प्लस ३२ जीबी गोल्ड व्हेरिएंट ५७,८८५ रूपयात मिळेल. याच फोनचा १२८ जीबी जेट ब्लॅक व्हेरिएंट ७९,००० रूपयात खरेदी करता येईल.

आयफोन ६ – ३२ जीबी स्पेस ग्रे मॉडल २४,९९९ रूपयात, ३२ जीबी गोल्ड मॉडल २५, ९९९ रूपयात. आयफोन ६ एस ३२ जीबीचं स्पेस ग्रे मॉडल ३२,९९९ रूपयात आणि आयफोन ६ एस ३२जीबीचं गोल्ड मॉडल ३३,९९९ रूपयात घेऊ शकतात.

याबरोबरच फ्लिपकार्टवर अ‍ॅपल वॉच सीरिज ८५०० रूपयात खरेदी करता येऊ शकते. तर आयपॅड २२,९०० रूपयात फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. या सेलमध्ये एसबीआय कार्ड युजर्सना जास्त फायदा मिळणार आहे. कारण या खरेदीसाठी जर तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरलं तर ५ टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. इतकेच नाही तर एसबीआय यूजर्ससाठी EMI चा पर्यायही आहे.