22 October 2020

News Flash

Flipkart Big Billion Day ला सुरुवात, जाणून घ्या ऑफर्स आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी

अनेक आकर्षक ऑफर

Flipkart Big Billion Days 2020 : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. Flipkart चा बहुप्रतिक्षीत बिग बिलियन डेजच्या सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सेल सहा दिवस चालणार असून २१ ऑक्टबरपर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर आणि शानदार डिल्स मिळतील.

Flipkart ने Big Billion Sale साठी SBI (State Bank of India)सोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे… सेलदरम्यान एसबीआयच्या कार्डने पैसे भरणाऱ्यांना १० टक्केंचा इंनस्टट डिस्काऊंट मिळणार आहे. डिस्काऊंटसह बजाज फायनस ईएमआय कार्ड आणि इतर बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर कोणत्याही व्याजासह आएमआयची सुविधा उपलबद्ध आहे. पेटीएम वॉलेट आणि Paytm UPI ने बील भरणाऱ्या ग्राहकांना मोठा कॅशबॅक मिळणार आहे.

Flipkart Big Billion Daysमध्ये प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. १६ ऑक्टोबर पासून मनसोक्त खरेदी करु शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड एक्सेसरीजवर ८० टक्केंपर्यंच डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये बेस्ट-सेलिंग लॅपटॉपवर ६० टक्केंची सूट मिळणार आहे.

TV आणि इतर मोठ्या एप्लायंसेजवर ७५ टक्केंपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच एक्सचेंज ऑफर्स आणि व्याजाशिवाय ईएमआयची सुविधा उपलबद्ध आहे.

कपडे आणि एक्सेसरीजवर 60 ते 80 टक्केंचां डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टचा दावा आहे की सेलच्या पहिल्यादिवशी एक्स्ट्रा दहा टक्के डिस्काटउंट मिळणार देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टने स्वत:च्या प्रोडक्ट्सवर ६० टक्केपर्यंतचा डिस्काउंट दिला आहे. यामध्ये होम एप्लायंसेज आणि फर्नीचरचा समावेश आहे. बिग बिलियन डे सेलमध्ये दररोज नवनवीन ऑफर आणि डिल्स मिळणार असल्याचा दावा फ्लिपकार्ट कंपनीने केला आहे.

याशिवाय ग्राहकांना मोबइल आणि टिव्हीवर सकाळी ८ आणि १२ वाजता तसेच दुपारी ४ वाजता क्रेजी डिल्स मिळणार आहेत. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी बिग बिलियन डेज सेल ऑफर्स आणि शानदार डील्ससह 15 अक्टूबर रात्री ८ वाजता सुरु होणार आहे तर इतर ग्राहकांना रात्री १२ नंतर हा सेल सुरु होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 7:59 am

Web Title: flipkart big billion days sale live updates best deals on phones tvs laptops and more nck 90
Next Stories
1 गाढ झोप करोनापासून बचाव करते का? डॉक्टर सांगतात…
2 ‘हॅचबॅक’ला पर्याय नॅनो एसयूव्ही
3 ‘फाइव्ह-जी’ अ‍ॅपल आयफोन बाजारात
Just Now!
X