Flipkart Big Billion Days Sale : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. अशामध्येच Flipkart चा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सहा दिवस हा सेल चालणार असून २१ ऑक्टबरला शेवटचा दिवस असेल. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर आणि शानदार डिल्स मिळतील. Big Billion Days च्या सेलमध्ये मोबाइल फोन्सवर मिळाणाऱ्या ऑफर आणि डिल्स समोर आल्या आहेत. या सेलमध्ये Samsung आणि Oppo या ब्रांडच्या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. पाहूयात कोणत्या मोबाईलवर किती रुपयांची सूट मिळणार आहे…

Samsung Galaxy S20 Plus Price in India
फेब्रुवारी २०२० मध्ये सॅमसंगने Galaxy S20 या स्मार्टफोन्सला लाँच केलं आहे. सध्या सॅमसंगच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोन्सची किंमत ७७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. पण सेलदरम्यान हा स्मार्टफोन्स ४९ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. म्हणजेच या स्मार्टफोन्सवर बिग बिलियन डेज या सेलमध्ये २८ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

आणखी वाचा : भन्नाट ऑफर : ७० टक्के रक्कम द्या अन् सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन घरी घेऊन जा

Samsung Galaxy Note 10 Plus Price in India
सॅमसंग कंपनीचा १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा Galaxy Note 10 Plus हा प्लॅगशिप स्मार्टफोन सध्या ८५ हजार रुपयांना विकला जातोय. पण बिग बिलियन डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन ५४ हजार ९९० रुपयांना विकत घेता येईल. म्हणजेच.. या सेलमध्ये Galaxy Note 10 Plus या स्मार्टफोन्सवर ३० हजार १० रुपयांची सूट मिळत आहे.

आणखी वाचा : Flipkart Big Billion Day 2020 : जाणून घ्या ऑफर्स, वेळ आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी

Samsung Galaxy A50S Price in India
4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा सॅमसंगचा Galaxy A50S हा स्मार्टफोन सध्या Flipkart पर 18,570 रुपयांना विकला जातोय. मात्र, सेलदरम्यान हा स्मार्टफोन १३ हजार९९९ रुपयांना विकत घेता येईल. म्हणजेच या स्मार्टफोन्सवर ४५७१ रुपयांची सूट देण्यात आली आहे.

Oppo Reno2 F Price in India
६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या Oppo च्या Reno2 F या स्मार्टफोनची किंमत सध्या १८ हजार ९९० रुपये इतकी आहे. पण Flipkart Sale दरम्यान ग्राहकांना हा फोन १६९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोन्सवर तुम्हाला दोन हजार रुपयांची सूट मिळणार आहे.