News Flash

Flipkart Sale : नोकिया 6.1 प्लस कसा मिळवाल केवळ 1149 रुपयांत?

15 हजार 999 रुपयांचा हा फोन अवघ्या 1149 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. 

Flipkart दिवाळी सेलचा आज अखेरचा दिवस आहे. यामध्ये स्मार्टफोनपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर भरघोस सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये Nokia 6.1 plus या स्मार्टफोनवर इंस्टंट डिस्काउंट आणि अनेक ऑफर्स ठेवण्यात आल्यात. त्यामुळे 15 हजार 999 रुपयांचा हा फोन अवघ्या 1149 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

फ्लिपकार्टकडून या फोनवर एक हजार रुपयांची थेट सूट देण्यात आली आहे. याशिवाय नो कोस्ट इएमआयची सुविधाही आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के सूट मिळेल. यासोबत कंपनी तब्बल 13 हजार 850 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. म्हणजे ज्यांना हा फोन खरेदी करायची इच्छा असेल, ते आपल्या जुन्या फोनची एक्सचेंज ऑफरमध्ये किती किंमत मिळेल हे फ्लिपकार्टवर पाहू शकतात. जास्तीत जास्त 13 हजार 850 रुपयांची सूट यामध्ये मिळू शकते. अशाप्रकारे हा स्मार्टफोन 1149 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Nokia 6.1 Plus मध्ये 5.8 फुल एचडीप्लस (1080×2280 पिक्सल) डिस्प्ले आणि 2.5डी गोरिला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. डिस्प्लेवर एक नॉच देण्यात आली असून स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. 64 जीबी अंतर्गत मेमरी आणि मेमरीकार्डद्वारे 400 जीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे.

यात, अँड्रॉइड 8.1 ओरिओ, ड्युएल सिम आणि 3060 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला फास्ट चार्जिंगचा दावा केला आहे. ही बॅटरी 30 मिनिटांतच 50 टक्के चार्ज होते. 16 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसरसह ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढील बाजुला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 4:22 pm

Web Title: flipkart big diwali sale buy nokia 6 1 plus for rs 1149
Next Stories
1 दिवाळीची आकर्षक मराठी शुभेच्छापत्रे
2 जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाचा 159 रुपयांचा नवा प्लॅन
3 कापड उद्योगात पतंजलीचा प्रवेश, दिवाळीच्या मुहूर्तावर दालनाचे उद्घाटन
Just Now!
X