18 October 2019

News Flash

Flipkart Big Shopping Days: लोकप्रिय स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट

स्मार्टफोन्ससाठी असलेला हा यावर्षीचा सर्वात मोठा सेल असेल असा फ्लिपकार्टचा दावा

इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचा Big Shopping Days हा उन्हाळी सेल आजपासून सुरू झाला आहे. 15 ते 19 मे दरम्यान हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणं यासोबत अनेक गॅझेट्सवर सवलत दिली जात आहे. या सेलसाठी कंपनीने तत्काळ कॅशबॅक आणि सवलतींसाठी एचडीएफसी बॅंकेसोबत भागीदारीही केली आहे. स्मार्टफोन्ससाठी असलेला हा यावर्षीचा सर्वात मोठा सेल असेल, असा फ्लिपकार्टचा दावा आहे.

जाणून घेऊया या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट मिळेल-
– Redmi Note 5 Pro वर 5,000 रुपये डिस्काउंट

– 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या हा स्मार्टफोन सवलतीनंतर 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

-Mi A2 या स्मार्टफोनवर 6,500 रुपयांची सवलत या सेलमध्ये मिळत असून 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

-Realme 2 Pro स्मार्टफोनवर 4 हजार 500 रुपयांची सूट मिळत आहे. यामुळे हा फोन तुम्हाला 10 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

-Oppo K1 या स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांची सूट आहे. परिणामी हा फोन 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

-Nokia 5. 1 Plus वर 5,200 रुपयांची सवलत आहे. तसंच Asus Max Pro M2 या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची सवलत आणि Vivo Y81 स्मार्टफोनवर जवळपास 6000 रुपये डिस्काउंट या सेलमध्ये दिलं जात आहे.

-सॅमसंगच्या Galaxy J6 स्मार्टफोनवर जवळपास 3 हजार 500 रुपयांची सवलत असून हा स्मार्टफोन 9 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

–  28 हजार 990 रुपये किंमत असलेला Oppo F11 Pro (6GB|64GB) हा स्मार्टफोन 24 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

First Published on May 15, 2019 1:27 pm

Web Title: flipkart big shopping days discount on popular smartphones and all electronic appliances