21 October 2020

News Flash

iPhone-6 खरेदी करा केवळ 6 हजार 500 रुपयांत

अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी

(संग्रहित छायाचित्र)

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या इ कॉमर्स संकेतस्थळांवर गेल्या काही दिवसांपासून सेल सुरू आहेत, त्यामुळे ग्राहकांसाठी विविध ऑफर्स उपलब्ध आहेत. सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊया काय आहे नेमकी ऑफर.

फ्लिपकार्टवर ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. iPhone-6 च्या 32जीबी व्हेरियंटवर ही ऑफर आहे. हा फोन ग्राहकांना 3,667 रुपये प्रतिमहिना नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करण्याचीही ऑफऱ आहे. याशिवाय 731रुपये प्रतिमहिना भरुनही हा फोन खरेदी करता येऊ शकतो. तसंच या फोनवर 15 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीकडून दिली जात आहे. म्हणजे तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घेतल्यास 15 हजार रुपयांची सूट मिळेल. कोणत्या फोनवर किती सूट देण्यात आली आहे, याची माहिती फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर देण्यात आलीये.

म्हणजे जर कोणाला पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली तर फोनची किंमत कमी होवून केवळ 6 हजार 999 रुपये होईल. याशिवाय एसबीआयच्या कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट आणि अजून 700 रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे हा फोन तुम्हाला केवळ 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 4:39 am

Web Title: flipkart big shopping days sale buy iphone 6 at with many offers
Next Stories
1 व्होडाफोनची दमदार ऑफर, १९९ रुपयांत दररोज २.८ GB डेटा
2 मिरचीपासून तयार केलेले औषध लठ्ठपणाविरोधात उपयुक्त
3 बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS या बाईक भारतात लाँच
Just Now!
X