17 July 2019

News Flash

Flipkart Big Shopping Days सुरू, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स

या सेलमध्ये स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि अन्य अनेक वस्तूंवर विविध ऑफर

‘फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज’ सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि अन्य अनेक वस्तूंवर विविध ऑफर मिळत आहेत. आजपासून(दि.6) 8 डिसेंबरपर्यंत हा सेल असेल. या सेलसाठी फ्लिपकार्टने एचडीएफसी बँकेशी भागीदारी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल. याशिवाय, फ्लिपकार्टवर एक्सचेंज डिस्काउंट, डिस्काउंट बायबॅक ऑफर, मोबाइल प्रोटेक्शन प्लान यांसार्ख्या ऑफरही आहेत.

फ्लिपकार्ट सेल ऑफर –
शाओमी पोको एफ1 या स्मार्टफोनचे सर्व व्हेरिअंट्स सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 20,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांमध्ये. तर, 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 23,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय, पोको एफ1 या स्मार्टफोनचं 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज वेरिअंट 29,999 रुपयांऐवजी 25,999 रुपयांत खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट सेलमध्ये रियलमी सी1 स्मार्टफोनवर एक हजार रुपयांची सूट मिळत असून हा फोन 7,499 रुपयांत खरेदी करता येईल. तर, रियलमी 2 स्मार्टफोन 9,990 रुपयांऐवजी 9,499 रुपयांत, तर रियलमी 2 प्रो 14,990 रुपयांऐवजी 13,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला झेनफोन लाइट एल1 केवळ 4 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसंच, मोटोरोला वन पावर हा स्मार्टफोन या सेलमध्ये 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

First Published on December 6, 2018 12:00 pm

Web Title: flipkart big shopping days started offers on smart phones