ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेलचा आज अखेरचा दिवस आहे. 26 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या सेलमध्ये टॉप कंपन्यांच्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर आणि डिस्काउंटची ऑफर आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर 33 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ट्रांजेक्शन केल्यास 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. जाणून घेऊया या सेलमध्ये कोणत्या ऑफर आहेत…

सॅमसंग गॅलेक्सी S20+
सॅमसंगचा या शानदार स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर 83 हजार रुपये आहे पण सेलमध्ये हा फोन 49,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटर्नल स्टोरेजचा हा फोन सेलमध्ये 5,556 रुपयांच्या किमान ईएमआयवरही ऑर्डर करता येईल. याशिवाय 14,300 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरचा लाभही मिळू शकतो.

रिअलमी नार्झो 20 प्रो :-
6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन सेलच्या अखेरच्या दिवशी तीन हजार रुपयांच्या सवलतीसह 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनवर 13,100 रुपयांपर्यंतचा फायदाही होऊ शकतो. फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. सुपर डार्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी आहे.

आयफोन XR :-
सेलमध्ये 47 हजार 900 रुपये किंमतीचा हा फोन सवलतीसह 38 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत या फोनच्या खरेदीवर 14 हजार 300 रुपयांपर्यंत डिस्काउंटही मिळू शकतं. 64जीबी इंटरनल मेमरी आणि 6.1 इंच डिस्प्ले असलेल्या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा रिअर आणि 7 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पोको M2 प्रो :-
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलच्या अखेरच्या दिवशी पोको M2 प्रो हा स्मार्टफोन 16,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असेल. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत या फोनच्या खरेदीवर 12,400 रुपयांपर्यंत डिस्काउंटही मिळू शकतं. 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5000mAh क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीसह या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरचा सपोर्ट आहे.

मोटोरोला G9 :-
4जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेजचा हा फोन सेलमध्ये 14,999 रुपयांऐवजी 9,999 रुपयांत उपलब्ध आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन 9,200 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटही मिळू शकतं. फोनमध्ये 48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. स्टॉक अँड्रॉइड असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरचा सपोर्ट आहे.