सणवार आले की मॉल, दुकाने यांच्याबरोबरच अनेक ऑनलाइन पोर्टलवरुनही विविध आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देण्यात येतात. नवरात्रीच्या मुहूर्तावर अशाच ऑफर्स ऑनलाइन विक्रीमध्ये अग्रेसर असणाऱ्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने जाहीर केल्या आहेत. यामध्ये कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सगळ्यावर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. बुधवारी २० सप्टेंबर रोजी ही ऑफर सुरु झाली असून ग्राहकांना या सेलचा लाभ २४ सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. मागील काही काळात ऑनलाइन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना हा सेल ग्राहकांसाठी उत्तम संधी ठरणार आहे. यामध्ये विशेषतः नामवंत कंपन्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट देण्यात आली आहे. काय आहेत या ऑफर्स जाणून घेऊया…

सॅमसंग गॅलॅक्सी एस ७

हा फोन ४६ हजारांना असून त्यावर तब्बल १६ हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना अवघ्या २९,९९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन घेतल्यास आणखी ३ हजारांची सूट मिळणार आहे.

हुवाई पी ९

या फोनवर तब्बल २५ हजार रुपयांची सूट देण्यात आली असून ३९,९९९ रुपयांचा हा फोन ग्राहकांना १४,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

ऑनर ६ एस

११,९९९ रुपयांचा हा फोन एक हजार रुपयांची सूट मिळाल्यानंतर १०,९९९ रुपयांना मिळणार आहे.

असूस झेनफोन ४ सेल्फी

सेल्फीसाठी प्रसिद्ध असलेल्या असूस कंपनीच्या झेनफोन ४ वर १ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन ९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

पॅनासॉनिक अलुगा रे ७००

या स्मार्टफोनवर २ हजार रुपयांची सूट मिळणार असून आता तो ९,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे.

यु युरेका

नुकत्याच बाजारात आलेल्या यु युरेका या फोनवर तब्बल २००० रुपयांची सूट मिळणार असून हा फोन ११,९९९ रुपयांना फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे.

त्यामुळे तुम्ही जर नवीन मोबाईल विकत घ्यायचा विचार करत असाल तर या सगळ्या ऑफर्सचा तुम्ही नक्की विचार करु शकता. याशिवाय अॅमेझॉनवरही अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कपड्यांच्या अनेक ब्रँडवर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. याबरोबरच किचन डेकॉर आणि घरातील इतर वस्तूंवरही ७० टक्क्यांहून जास्त सूट देण्यात येत आहे. मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.