अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इ-कॉमर्स संकेतस्थळांकडून विविध आकर्षक सेल आयोजित केले जात आहेत. Amazon आणि Flipkart सारख्या दिग्गज कंपन्यांनी दिवाळी सेलचं आयोजन केलं असून फ्लिपकार्टच्या Big Diwali Sale ला 12 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली असून 16 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरू असेल. तर, अॅमेझॉनच्या Great Indian Festival सेलला 13 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर आकर्षक सवलत दिली जात आहे.

सर्वप्रथम जाणून घेऊयात Flipkart च्या सेलमध्ये कोणत्या फोनवर किती सवलत –
– iPhone 7 वर तीन हजार रुपयांची सवलत :
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 7 च्या 32GB व्हेरिअंटची 26 हजार 999 रुपयांमध्ये विक्री सुरू आहे. याची सध्याची किंमत 29 हजार 900 रुपये आहे. याशिवाय फ्लिपकार्टकडून 11 हजार 900 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आणि SBI सह अन्य बँकेच्या कार्डधारकांसाठी 10 टक्के डिस्काउंट आहे.

– Redmi Note 7S वर चार हजार रुपयांची सवलत :
या सेलमध्ये शाओमीच्या रेडमी नोट 7S च्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 9 हजार 999 रुपयांमध्ये विक्री सुरू आहे. यावर 9 हजार 500 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देखील आहे.

-Google Pixel 3a, Pixel 3a XL वर 10 हजार रुपयांची सवलत :
गुगल स्मार्टफोन पिक्सल 3a आणि पिक्सल 3a XL फ्लिपकार्टच्या सेलमधून स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 10 हजार रुपयांच्या सवलतीसह Pixel 3a स्मार्टफोनमधील 64जीबी व्हेरिअंट 29 हजार 999 रुपयांमध्ये आणि Pixel 3a XL स्मार्टफोनमधील 64जीबी व्हेरिअंट 34 हजार 999 रुपयांमध्ये करेदी करता येईल.

-Samsung Galaxy S9 वर 32,500 रुपयांची सवलत :
सॅमसंगच्या Galaxy S9 स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत असून हा स्मार्टफोन 29 हजार 999 रुपयांमध्ये (मूळ किंमत 62,500 रुपये ) विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसंच या स्मार्टफोनवर 14 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देखील आहे.

Amazon च्या सेलमध्ये कोणत्या फोनवर किती सवलत –
-Apple iPhone XR वर जवळपास सात हजार रुपयांची सवलत :
Apple च्या आयफोन एक्सआरवर Amazon कडून भरघोस डिस्काउंट आहे. यातील 49 हजार रुपये किंमत असलेला 64 जीबी व्हेरिअंट 42 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय ICICI बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळेल.

-OnePlus 7 वर तीन हजार रुपयांची सवलत :
लोकप्रिय स्मार्टफोन वनप्लस 7 मधील 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिअंट 29 हजार 999 रुपये (मूळ किंमत 32,999 रुपये) आणि 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिअंट 34 हजार 990 रुपयांमध्ये (मूळ किंमत 37,999 रुपये) खरेदी करता येईल. याशिवाय 13 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आणि ICICI बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट ऑफर देखील आहे.

आणखी वाचा- तातडीने Delete करा धोकादायक 29 अ‍ॅप्स, गुगलने Play Store मधूनही हटवले

-OnePlus 7 Pro वर 4 हजार रुपयांची सवलत :
वनप्लस 7 प्रो या स्मार्टफोनवरही भरघोस सवलत असून यातील 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिअंट 44 हजार 999 रुपये (मूळ किंमत 48,999 रुपये) आणि 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिअंट 48 हजार 999 रुपयांमध्ये (मूळ किंमत 52,999 रुपये) खरेदी करता येईल. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

-Samsung Galaxy Note 9 वर 30 हजार रुपयांची सवलत :
अॅमेझॉनच्या सेलमध्ये सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 42 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. लाँचिंगवेळेस 73 हजार 600 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत होती.