ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने आता विमान तिकीट बुकिंगची सेवा सुरू केली आहे. कंपनीचं ‘फ्लाइट बुकिंग पोर्टल’ लाइव्ह झालं असून याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकीट बुक करता येईल. यावरुन तिकीट बुकिंग केल्यास अनेक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा फ्लिपकार्टद्वारे विमान तिकीट बुक करत असाल तर डिस्काउंटसह अन्य अनेक ऑफर आहेत. तसेच तिकीट बुकिंगसाठी EMI चा पर्यायही देण्यात आला आहे. युजर तिकीट बुकिंग करतेवेळी तिकिटाच्या एकूण रक्कमेच्या केवळ 10 टक्के रक्कम भरुन विमान प्रवास करु शकेल. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येईल. म्हणजेच फ्लिपकार्टवर ईएमआयद्वारेही तिकीट बुकिंग करता येणार आहे.

कसा करायचा वापर?
जर तुम्ही मोबाइलचा वापर करत असाल तर Flipkart travel app डाउनलोड करु शकता. याशिवाय, http://www.flipkart.com/travel/flights या वेबसाइटवर जाऊनही तिकीट बुक करु शकता. अन्य वेबसाइट्सच्या तुलनेत या वेबसाइटवरुन सर्वात स्वस्त दरात विमान तिकीट बुक करता येईल असा कंपनीचा दावा आहे. फ्लिपकार्ट ट्रॅव्हलच्या वेबसाइटला भेट दिल्यास टॉप डील्समध्ये अनेक ऑफर मिळतील. या ऑफर ‘फर्स्ट टाइम युजर’, ‘डोमेस्टिक फ्लाइट’, ‘राउंड ट्रिप’ आणि ‘ऑल फ्लाइट बुकिंग्स’ या श्रेणींमध्ये आहेत.

काय आहेत ऑफर?
– बेस्ट डीलअंतर्गत बुकिंगच्या वेळी केवळ 10 टक्के पैसे भरुन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येते. म्हणजे विमानाचं तिकिट ईएमआयवर खरेदी करता येईल.
-याशिवाय, फ्लिपकार्टचे नेहमीचे वापरकर्ते तिकिट बुकिंगसाठी आपल्या सुपर कॉइन्सचा वापर करु शकतात. जर एखाद्याकडे जास्त सुपर कॉइन्स असतील तर त्याद्वारे तिकिट खरेदी करुन तो मोफत प्रवास करु शकेल. फ्लिपकार्टवर शॉपिंग केल्यानंतर ग्राहकाला सुपर कॉइन्स मिळत असतात.
-पहिल्यांदा या पोर्टलचा वापर करणाऱ्या ग्राहकांना तिकिट बुकिंगवेळी FKNEW10 या कुपन कोडद्वारे तिकिट दरावर 10 टक्के डिस्काउंट मिळेल.
-तर, FKDOM या कुपन कोडद्वारे देशांतर्गत विमान तिकिटावर 2,500 रुपयांची सवलत मिळेल.
-याशिवाय राउंड ट्रिप बुकिंगवर RNDTRIP चा वापर केल्यास 600 रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच FLYTWO कुपन कोडद्वारे 750 रुपये डिस्काउंट मिळेल.