26 February 2021

News Flash

साध्या टीव्हीवर घेता येईल Smart TV ची मजा, Nokia Media Streamer भारतात लाँच; किंमत…

अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकपेक्षा किंमत कमी...

नोकियाने भारतात नवीन मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणलं आहे. Nokia Media Streamer हे नवीन डिव्हाइस नोकियाने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लाँच केले. 28 ऑगस्टपासून Nokia Media Streamer ची विक्री सुरू होईल. डिव्हाइस कनेक्ट करुन युजर्सना आपल्या साध्या टीव्हीवरही स्मार्ट टीव्हीची मजा घेता येईल.

फीचर्स :-
‘नोकिया मीडिया स्ट्रीमर’ अँड्रॉइड 9 वर कार्यरत असून यासोबत एक डेडिकेटेड रिमोटही मिळेल. फुल-एचडी रिझोल्यूशन स्ट्रीमिंगचा सपोर्ट या डिव्हाइसला आहे. अन्य लोकप्रिय स्ट्रीमिंग डिव्हाइस Mi TV स्टिक आणि अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकप्रमाणे हे स्ट्रीमरही एचडीएमआय पोर्टद्वारे कनेक्ट करता येते. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे. नोकिया मीडिया स्ट्रीमरच्या रिमोटमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट आणि Netflix व Zee5 साठी वेगळं बटण देण्यात आलं आहे. नोकिया मीडिया स्ट्रीममध्ये अ‍ॅप्स आणि डेटासाठी 1 जीबी रॅम व 8 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच यामध्ये क्वॉड-कोर प्रोसेसरसोबत माली 450 जीपीयू आहे. हे डिव्हाइस गुगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्सना सपोर्ट करतं आणि याद्वारे विविध प्रकारच्या सर्व्हिस डाउनलोड किंवा स्ट्रीम करता येतात. रिमोटवरील वेगळ्या बटणामुळे या डिव्हाइसमध्ये युट्यूब आणि Google Play Movies या गुगलच्या अन्य अ‍ॅप्सप्रमाणे नेटफ्लिक्स आणि झी5 देखील प्री-इंस्टॉल असेल अशी शक्यता आहे.

किंमत :-
नुकत्याच लाँच झालेल्या Mi TV Stick व अ‍ॅमेझॉनच्या Fire TV Stick ला नोकिया मीडिया स्ट्रीमरद्वारे टक्कर मिळणार आहे. भारतात एमआय टीव्ही स्टिकची किंमत 2,799 रुपये आणि अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक 3,999 रुपयांना आहे. तर,  Nokia Media Streamer ची किंमत 3,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 1:08 pm

Web Title: flipkart launches nokia media streamer in india at check price and other details sas 89
Next Stories
1 अमेरिकेतही साबुदाणा खिचडीची क्रेझ
2 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फीचर्स, ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी
3 एका वर्षापर्यंत ‘फ्री’मध्ये पाहा टीव्ही, Airtel ची भन्नाट ऑफर
Just Now!
X