मोटोरोलाचा स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G 5G आता अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिटपकार्टवर 25 जानेवारीपासून Mobile Bonanza Sale सुरू झाला असून 29 जानेवारी सेलचा अखेरचा दिवस असेल. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंटची ऑफर आहे. Motorola ने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता. जाणून घेऊया कसा आहे Moto G 5G आणि काय आहे ऑफर:-

Moto G 5G डिस्प्ले :-Moto G 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Moto G 5G स्टोरेज :- 6 जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Moto G 5G कॅमेरा :- या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, तर 8 मेगापिक्सेलचा वाइड अँगल आणि तीसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

Moto G 5G बॅटरी :- मोटोरोलाच्या या शानदार फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, ही बॅटरी 20W च्या टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G 5G कनेक्टिव्हिटी :- फोनसोबत कनेक्टिव्हिटीसाठी 5G, NFC, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11ac, 3.5mm हेडफोन जॅक, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएससोबत बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP52 रेटिंग मिळाली असून गुगल असिस्टंटसाठी फोनमध्ये वेगळं बटणही दिलं आहे.

Moto G 5G ऑफर आणि किंमत:- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँचिंगवेळी मोटोरोलाने या फोनची किंमत 20,999 रुपये ठेवली होती. पण सेलमध्ये हा फोन 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. याशिवाय हा फोन खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १० टक्के सवलत मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरही ५ टक्के सूट मिळू शकते. याशिवाय एक्स्चेंज ऑफरअंतर्गत तब्बल १६ हजार ५०० रुपयांची बचत होऊ शकते. तसेच सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.