Poco M2 Pro हा पोको कंपनीचा ‘मिड रेंज’ सेगमेंटमधला स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच झालेल्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिटपकार्टवर 25 जानेवारीपासून Mobile Bonanza Sale सुरू झाला असून 29 जानेवारी सेलचा अखेरचा दिवस असेल. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंटची ऑफर आहे. जाणून घेऊया कसा आहे Poco M2 Pro आणि काय आहे ऑफर:-

Poco M2 Pro फीचर्स :-
ड्युअल सिम सपोर्ट असलेला Poco M2 Pro अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 for Poco वर कार्यरत आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून 6 जीबीपर्यंत LPDDR4X RAM आहे. पोको एम2 प्रोमध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोड सपोर्ट असलेला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 128 जीबी मेमरी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. आउट ऑफ द ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि टू शेड्स ऑफ ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

आणखी वाचा- 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; Moto G 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी

किंमत आणि ऑफर :-
पोको एम2 प्रो हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यातील 4 जीबी रॅम व्हेरअंटची किंमत सेलमध्ये 11,999 रुपये तर 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे. पण, आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सवलत मिळू शकते. त्यानुसार पोको एम2 प्रो (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) हा स्मार्टफोन सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एक्स्चेंज ऑफरचा फायदाही सेलमध्ये मिळू शकतो. याशिवाय दरमहा 500 रुपये नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही मिळेल.