24 September 2020

News Flash

Flipkart Mobile Bonanza Sale: स्मार्टफोन खरेदीवर बंपर डिस्काउंट

22 नोव्हेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार असून यामध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट

Flipkart Mobiles Bonanza सेल सुरू झाला आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार असून यामध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या सेलमध्ये जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला नेसल तर तुमच्याकडे पुन्हा एकदा चांगली संधी आहे.

काही स्मार्टफोनवर Flipkart Big Billion Days सेलमध्ये जेवढी सूट देण्यात आली होती, तेवढीच सूट दिली जात आहे. Mobiles Bonanza सेलसाठी फ्लिपकार्टने एचडीएफसी बँकेशी भागीदारी केली आहे. ग्राहकांना नो कोस्ट इएमआयचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसंच जुने फोन बदलून एक्सचेंज ऑफरअंतर्गत अतिरिक्त सूट देखील मिळेल. जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती सूट मिळत आहे.

Asus ZenFone Max Pro M1 : हा स्मार्टफोन पुन्हा एकदा फ्लिपकार्टच्या सेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं बेसिक व्हेरिअंट 9,999 रुपयांमध्ये (एमआरपी 10,999 रुपये) उपलब्ध आहे. तर, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची 10,999 रुपयांना (एमआरपी 12,999 रुपये) विक्री केली जात आहे. सर्वात पावरफुल व्हेरिअंट 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Nokia 6.1 Plus
नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोन Flipkart Mobiles Bonanza सेलमध्ये 14,999 रुपयांमध्ये (एमआरपी 17,600 रुपये) खरेदी करता येईल.

Xiaomi Poco F1
शाओमी पोको एफ1 20,999 रुपयांमध्ये (एमआरपी 21,999 रुपये) खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Honor 9N
हॉनर 9एन पुन्हा एकदा फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांमध्ये (एमआरपी 13,999 रुपये) उपलब्ध करण्यात आला आहे.

Nokia 5.1 Plus
फ्लिपकार्ट सेलमध्ये नोकिया 5.1 प्लस 10,499 रुपयांमध्ये (एमआरपी 13,199 रुपये) खरेदी करता येईल.

Galaxy On6
सॅमसंग गॅलेक्सी ऑन6 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9,990 रुपयांमध्ये (एमआरपी 15,490 रुपये) उपलब्ध करण्यात आला आहे.

Motorola One Power
Flipkart Mobiles Bonanza सेलमध्ये मोटोरोला वन पावर हा स्मार्टफोन 15,999 रुपयांमध्ये (एमआरपी 18,999 रुपये)खरेदी करण्याची संधी आहे.

Moto X4
मोटो एक्स4 हा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयांमध्ये (एमआरपी 22,999 रुपये) खरेदी करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 4:27 pm

Web Title: flipkart mobiles bonanza sale discounts on smart phone
Next Stories
1 १६ ते २२ वयोगटातील सर्वाधिक तरुण इंटरनेटच्या आहारी
2 खुशखबर! डेबिट-क्रेडिट कार्डचे फायदे आता एकाच कार्डात
3 चार रिअर कॅमेरे असलेला सॅमसंगचा स्मार्टफोन आज भारतात होणार लाँच
Just Now!
X