30 September 2020

News Flash

फ्लिपकार्टचं आता ‘हायपरलोकल डिलिव्हरी’ क्षेत्रात पाऊल; जाणून घ्या काय आहे ही सेवा?

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता कात टाकण्याच्या तयारीत आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता कात टाकण्याच्या तयारीत आहे. कारण फ्लिपकार्ट अनेक नवनव्या सेवा देण्याच्या तयारीत आहे. नुकतीच फ्लिपकार्टने लहान मुलांच्या फर्निचरची सेवा पुरवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही कंपनी भारतात ‘हायपरलोकर डिलिव्हरी सर्व्हिस’ सुरु करण्याच्या तयारीत आहे.

हायपरलोकल डिलिव्हरी सर्व्हिस म्हणजे अशी सेवा जी ग्राहकांना त्यांच्या घराजवळच्या दुकानातून वस्तू खरेदी करण्याची परवानगी देते. फ्लिपकार्टने प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच किराणा मालाच्या डिलिव्हरीची सेवा बंगळुरु शहरात सुरु केली आहे. सध्या, स्विग्गी जेनी, डुन्झो, उबर कनेक्ट आणि इतर कंपन्याही भारतात हायपरलोकल डिलिव्हरी सर्विस देतात. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

ही हायपरलोकल डिलिव्हरी सेवा फ्लिपकार्टच्या अॅपवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टने यासाठी काही स्थानिक गोदामं आणि दुकानदारांशी सहकार्य करार केला आहे. या दुकानांमधून ग्राहकांना फ्लिपकार्टच्या माध्यमातून वस्तू घरपोच मागवता येणार आहेत. सध्या फ्लिपकार्टने ‘स्पेन्सर्स’ आणि ‘विशाल मार्ट’ यांसारख्या साखळी दुकानांसोबत सहकार्य करार केला आहे. मात्र, फ्लिपकार्टने या सेवेबाबत अद्याप जाहीर घोषणा केलेली नाही.

सध्या भारतात ‘स्विग्गी’ आणि ‘झोमॅटो’ या दोन प्रसिद्ध कंपन्यांसह बिगबास्केट, ग्रोफर्स, जिओमार्ट या कंपन्या भारतात हायपरलोकल सेवा देतात. यामध्ये स्विग्गी आणि झोमॅटो या कंपन्यांची ६० मिनिटांमध्ये डिलिव्हरी असे धोरण आहे. या फूड डिलिव्हरी अॅप्सने स्थानिक दुकानांशी सहकार्य करार केला आहे. झोमॅटो आणि स्विग्गी जेवणाबरोबर आता किराणामालही ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवतात पण या मालाचे वजन १२ किलोपेक्षा जास्त असता कामा नये, असे त्यांचे धोरण आहे.

फ्लिपकार्टला सध्या अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे त्यांनी आता अधिकृतरित्या हायपरलोकल डिलिव्हरी मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टने नुकतेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन विमानाची तिकिट बुक करण्याचा पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. पहिल्यांदाच फ्लिपकार्टवरुन विमानाचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना कंपनीने डिस्काउंट आणि ऑफर्सही देऊ केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 5:04 pm

Web Title: flipkart now steps into hyperlocal delivery know what is this service aau 85
Next Stories
1 जग चीनविरोधात असताना चिनी कंपन्या मात्र मालामाल, PUBG ने महिन्याभरात कमावले तब्बल १७१४ कोटी
2 ट्रेनमध्ये सापडली १ कोटी ४४ लाखांची सोन्याची बिस्कीटं, मालक मात्र सापडेना; पोलीस म्हणतात…
3 लॉकडाउनदरम्यानही अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ४० अब्ज डॉलर्सची वाढ
Just Now!
X