24 January 2019

News Flash

फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या मोबाईलवर मिळणार ‘या’ सवलती

९ फेब्रुवारीपर्यंत लुटा खरेदीचा आनंद

फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाईटने नुकताच ‘सॅमसंग कार्निव्हल’ असा एक खास सेल आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोन, टॅबलेट, हेडफोन आणि टीव्ही या गोष्टींवर सूट मिळणार आहे. याबरोबरच रेफ्रीजरेटर, एअर प्युरीफायर, मायक्रोव्हेव, एसी आणि वॉशिंग मशीन अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. हा सेल ७ फेब्रुवारी रोजी सुरु झाला असून तो ९ फ्रेबुवारीपर्यंत सुरु राहील.

मोबाईल फोनवर मिळणारी सूट ही या सेलचे विशेष आकर्षण आहे. Samsung Galaxy S7 हा ४६ हजारांचा फोन या सेलमध्ये केवळ २२,९०० रुपयांना मिळणार आहे. S7 Edge ची किंमत ४१,९०० रुपये असून हा फोन ३५,९०० रुपयांना मिळू शकेल. ६४ जीबी मेमरी असलेला Galaxy On Nxt हा १७,९०० रुपयांचा फोन ११,९०० रुपयांना उपलब्ध आहे. तर १६ जीबीचा Galaxy On Nxt ९,९९९ रुपयांना मिळणार आहे. ३२ जीबींचा Galaxy On Max 3 हजारांची सूट मिळून १३,९०० रुपयांना मिळणार आहे.

या कार्निव्हलमध्ये टॅबलेटची किंमत ८,९९९ रुपयांपासून सुरु असून यामध्ये ईएमआय सुविधाही मिळू शकेल. Samsung gear fit 2 pro १३,५९० रुपयांना मिळू शकणार आहे. यातही प्रिपेडच्या ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तुम्ही जर सॅमसंगचे हेडफोन आणि स्पीकर घेण्याचा विचार करत असाल तर यावरही आकर्षक सूट मिळणार आहे. याशिवाय मेमरी कार्ड, हार्ड ड्राईव्ह आणि चार्जर यांसारख्या वस्तूंवरही ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर भरघोस लाभ मिळणार असून डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी खास सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

First Published on February 8, 2018 3:11 pm

Web Title: flipkart samsung carnival exciting offers for customers 7th to 9th february