14 December 2017

News Flash

‘या’ आहेत फ्लिपकार्टच्या नव्या ऑफर्स

स्वातंत्र्यदिन विशेष

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 8, 2017 5:22 PM

संग्रहित छायाचित्र

ऑनलाईन शॉपिंग करणे हे आता अगदी सोपे झाले आहे. मोबाईल, टॅब लॅपटॉपवरुन आपण घरबसल्या आपल्याला हवी असलेली कोणतीही गोष्ट अगदी सहज खरेदी करु शकतो. त्यामुळे ज्यांना शॉपिंगचे वेड आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधीच असते. सध्या मोठमोठे मॉल, दुकाने इतकेच काय आता शॉपिंग वेबसाईटसही अनोख्या ऑफर्स जाहीर करतात. याचप्रमाणे सध्या फ्लिपकार्टनेही ऑफर्स जाहीर केल्या आहेत. अॅमेझॉननंतर फ्लिपकार्टने ग्राहकांना आकर्षक ऑफर्स दिली आहे. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत कंपनीने या ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

९ ऑगस्ट रोजी सुरु होणारा फ्लिपकार्टचा हा सेल ११ ऑगस्टपर्यंत आहे. यामध्ये मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा यांसारख्या अनेक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय जे शिओमी कंपनीचा फोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तर आणखी एक खूशखबर आहे. रेड मी नोट ४ हे मॉडेल फ्लिपकार्टवर सलग ७२ तासांसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे एचडीएफसीचे क्रेडीट कार्ड आहे त्यांच्यासाठी आणखी काही ऑफर्स आहेत. याशिवाय जुना फोन एक्सचेंज केला तर आणखी १ हजार रुपयांची सूट मिळू शकणार आहे.

फ्लिपकार्टने सेलमधील सगळ्या ऑफर्सविषयी आताच काही जाहीर केले नसले तरीही काही डिस्काऊंटसबाबत खुलासा केला आहे. फ्लिपकार्टवर मोटो M आणि मोटो G5 प्लस ची किंमत १५,९९९ रु आणि १६,९९९ रुपये आहे. मात्र या सेलमध्ये हे स्मार्टफोन १२,९९९ रुपये आणि १४, ९९९ रुपयांना मिळू शकणार आहेत. याचप्रमाणे लिनोवो K5 नोट १२,९९९ रुपयांना आहे तो या सेलमध्ये ९,९९९ रुपयांना मिळू शकणार आहे. लिनोवो K6 पॉवर ९,९९९ रुपयांना आहे, त्यावर १ हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. गूगल पिक्सल XL ची किंमत ६७ हजार रुपयांवरुन ४८,९९९ रुपयांवर आणण्यात आली आहे. कंपनी आयफोन ६ के च्या ३२ जीबीच्या मॉडेलची किंमतही य़ा सेलमध्ये कमी करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र ही किंमत किती असेल हे मात्र अद्याप सांगण्यात आले नाही.

मोबाइलफोन शिवाय टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सोनीचा HD रेडी LED स्मार्ट टीव्ही, Vu 45-इंच UHD स्मार्ट टीव्ही, ४३ इंच ऑनिडा फुल HD LED स्मार्ट टीव्ही यांवरही सूट मिळणार आहे. इंटेलचा कोर i3 लॅपटॉपमध्येही सूट देण्यात येणार आहे. कॅनॉनच्या १३०० D DSLR कॅमरा, स्कलकँडीचे हेडफोनही स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. टच देण्यात आली आहे. याशिवाय लिनोवोची १०००mAh पॉवरबॅंक या सेलमध्ये केवळ ९९९ रुपयांना मिळणार आहे.

First Published on August 8, 2017 5:18 pm

Web Title: flipkart special offers for independence day best deals and discounts on mobile phones tv laptop camera and many more